एक्स्प्लोर

अँटिलीया प्रकरणः सचिन वाझे यांचे सहकारी रियाझुद्दीन काझी यांना 16 एप्रिलपर्यंत NIA कोठडी

अँटिलीया प्रकरणात कोर्टाने रियाजुद्दीन काझीला 16 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात पाठवले आहे. रियाझुद्दीन काझी हे सचिन वाझे यांचे सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : अँटिलिया प्रकरणाचा तपास सुरु झाल्यापासून नवनवीन माहिती समोर येत आहे. एनआयएच्या पथकाने आता सचिन वाझे यांचे निकटवर्तीय रियाझुद्दीन काझी यांना अटक केली आहे. रियाझुद्दीन काझी यांना एनआयएने काल रात्री 12.30 वाजता अटक केली. कोर्टाच्या हजेरीदरम्यान तो या प्रकरणातील सूत्रधार असून तपास यंत्रणेने कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर, कोर्टाने त्याला 16 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात दिले आहे.

सुनावणीदरम्यान तपास यंत्रणेने कोर्टात सांगितले की 8 मार्च रोजी हे प्रकरण एनआयएकडे आल्यानंतर या लोकांनी पुरावे नष्ट करायला सुरुवात केली. एनआयएने म्हटले आहे की पुरावे नष्ट करत असताना काझी तिथे उपस्थित होता.

तपास एजन्सीचा युक्तिवाद

  • एजन्सीने कोर्टाला सांगितले की या लोकांनी सीपीयू आणि डीव्हीआरची विल्हेवाट लावली. त्यावेळी रियाझुद्दीन काझी हे वाझे यांच्यासमवेत उपस्थित होता.
  • एजन्सीने सांगितले की आम्हाला काही सीसीटीव्ही फुटेज सापडले आहेत ज्यात वाझे आणि काझी एकत्र दिसले होते. न्यायालयात कोठडी देण्याच्या मागणीसंदर्भात एनआयएने असा युक्तिवाद केला की चौकशी दरम्यान सचिन वाझे यांनी अर्धवट माहिती दिलीय. या संदर्भात अधिक माहितीसाठी मिळवण्यासाठी काझीची चौकशी करायची आहे. आम्हाला सीडीआर आणि आयपीडीआर मिळाले असून प्राप्त झाले असून आम्हाला याबद्दल काझीकडे चौकशी करावी लागेल.
  • हे प्रकरण केवळ जिलेटिन किंवा मनसुख हिरण हत्या प्रकरणापर्यंत मर्यादित नाही. यासाठी पैसा कोणी दिले, जिलेटिन कुठून आले? याचीही माहिती मिळवायची आहे. 

काझी यांच्या वकिलाचा युक्तिवाद

  • कोठडीच्या मागणीचा काझी यांच्या वकिलांनी तीव्र विरोध केला. सुनावणीदरम्यान ते न्यायालयात म्हणाले की मी 20 दिवसांपासून एनआयएपुढे जात असून त्यांना सर्व माहिती दिली आहे. जेव्हा मला एनआयएकडून बोलावणं येतं तेव्हा हजर असतो. मी तपासात सहकार्य करीत आहे.
  • काझी यांचे वकील म्हणाले की, 13 मार्च रोजी वाझे यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा भारतीय पुरावा अधिनियम कलम 27 अंतर्गत काझी यांनी यात मदत देखील केली होती.
  • न्यायालयात युक्तिवाद मांडत असताना वकिलाने सांगितले की, तपास करणार्‍या एजन्सीमार्फत माझ्या क्लायंटला बळीचा बकरा बनवले जात आहे. माझ्या क्लायंटला अल्प मुदतीची एनआयए कोठडी देण्यात यावी. दोन्ही युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 16 एप्रिलपर्यंत काझीला एनआयएच्या ताब्यात पाठवले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत,  एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीसDattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP MajhaPune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Embed widget