एक्स्प्लोर

सायनमध्ये 22 कोटींचं 7 किलो हेरॉईन जप्त, मुंबई पोलिसांची कारवाई

याप्रकरणी एका महिला ड्रग्स सप्लायरला अटक करण्यात आलं

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ड्रग्ज विरोधात राज्य आणि केंद्राच्या पथकाने छापेमारी करत कारवाया सुरु केल्या आहेत. एकीकडे NCB ने मुंबईत ड्रग्जविरोधी कारवाई सुरु केली असतानाच आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानेही मोठी कारवाई केली आहे.  मुंबई पोलिसांच्या अंमली विरोधी पथकाने सायनमध्ये 22 कोटी रुपयांच्या किंमतीचं हेरॉईन जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाने मंगळवारी सायंकाळी सायन येथून 22 कोटी रुपये किंमतीचं सात किलो हिरॉईन जप्त केलं आहे. याप्रकरणी एका महिला ड्रग्स सप्लायरलाही अटक करण्यात आलं आहे. 

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या नेतृत्वात घाटकोपर युनिटने सायन परिसरात छापेमारी केली होती. त्यानंतर यामध्ये एका महिलेला सात किलो हिरॉइनसह बेड्या ठोकल्या आहेत. राजस्थान, प्रतापगड परिसरातून मुंबई पोलिसांची टीम गेल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. NDPS (Narcotic-Drugs-and-Psychotropic-Substances-Act) कायद्यानुसार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी दुपारी मुंबई पोलिसांकडून याबाबतची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. 

दरम्यान, दहा ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील न्हावा शेवा पोर्टवर DRI नं २५ किलो पेक्षा जास्त हेरॉइन जप्त केलं होतं. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली होती. तेलाच्या कॅनमध्ये अफगाणिस्तानातून नवी मुंबईत हेरॉइनची तस्करी करण्यात आली होती.

सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड; मुंबई क्राइम ब्रांचची कारवाई

मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने सोमवारी सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड केला. या रॅकेटमध्ये महिलांना वेश्या व्यवसायात काम करायला लावलं जायचं. विशेष म्हणजे यात महिला ग्राहकांसह भारतभर फिरण्यासाठी जायच्या. टूरवर कपल म्हणून अशा महिलांना ग्राहकांसोबत पाठवलं जायचं. मुंबई क्राइम ब्रांचच्या यूनिट 7 ला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली. मुंबई एअरपोर्टवर क्राइम ब्रांचच्या विशेष पथकानं सापळा रचत दोन महिलांना अटक केलं.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget