एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : भुजबळांनी फर्नांडिस यांचे मुंबईतील घर लाटल्याचा अंजली दमानियांचा आरोप; भुजबळांचं प्रत्युत्तर

Anjali Damania Vs Chhagan Bhujbal : फर्नांडिस कुटुंबाचं मुंबईतलं घर छगन भुजबळांनी लाटल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.

मुंबई : छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) सांताक्रूझ इथलं फर्नांडिस कुटुंबाचं घर लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला, त्याला आता छगन भुजबळांनीही उत्तर दिलं आहे. दमानिया या मीडिया स्टंट करत असून या प्रकरणी राजकारण करून आपली पोळी भाजून घेत असल्याचा आरोप भुजबळांनी केला आहे. 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळांनी यासंबंधी एक प्रसिद्धी पत्रक जारी केलं असून त्यामध्ये म्हटलंय की, याबाबत सध्या राज्यात ओबीसींची मोठी लढाई राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि आम्ही लढत आहोत काल झालेली सभा पाहता यात राजकारण करण्यासाठी अंजली दमानिया यांनी मीडिया स्टंट केला. आमचे देणे लागत नसतानाही माणुसकीच्या नात्यातून आम्ही मोबदला देण्याची तयारी दर्शविली मात्र तरी देखील दमानिया यात राजकारण आणून आपली पोळी भाजून घेत आहेत.

अंजली दमानियांचा आरोप

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळांवर गंभीर आरोप केले आहेत. फर्नांडिस कुटुंबाचं मुंबईतलं घर भुजबळांनी लाटल्याचा गंभीर आरोप दमानियांनी केला. येत्या 48 तासात भुजबळांनी पैसे न दिल्यास भुजबळांच्याच घराबाहेर बसणार असल्याचा इशाराही दमानिया यांनी दिला. शनिवारी दमानियांनी भुजबळांच्या घराबाहेर पत्रकार परिषद घेण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्यांना रोखलं. अखेर दमानियांनी स्वत:च्या घरी पत्रकार परिषद घेत भुजबळांवर गंभीर आरोप केले. 

काय म्हणाल्या होत्या अंजली दमानिया? 

भुजबळांचे प्रक्षोभक भाषण एकून तळपायाची आग मस्तकात गेली. कष्टाचे खातो असे ते म्हणाले. ते कुठल्या कष्टाचे खातात ते दाखवण्यासाठी माध्यमांना घेऊन गेले होते. या कुटुंबीयांचा बंगला हडपला. रहेजामध्ये या कुटुंबीयांना पाच फ्लॅट मिळणार होते. आता या परिवाराला एक रुपयाही मोबदला मिळालेला नाही 

सांताक्रुझ येथील छगन भुजबळ यांचे घर त्यांनी फर्नांडीस नावाच्या कुटुंबाकडून लाटलेले घर आहे. हे घर रिडेव्हलपमेंटसाठी गेले होते. समीर भुजबळ यांच्या कंपनीनं  फर्नांडीस यांचे घर लाटले 
सांताक्रुझ वेस्टची टोलेजंग इमारत ही इतरांची घरे लुटून उभी राहिली. येत्या 48 तासांत फर्नांडीस कुटुंबाला भुजबळांनी पैसे द्यावेत, अन्यथा भुजबळांच्या घराबाहेर आम्ही बसू. 

काय म्हणाले समीर भुजबळ? 

सांताक्रूझ येथील आमच्या निवासस्थानाच्या जागेबाबत अनेक गैरसमज पसरविले जात आहे मात्र वस्तिस्थितीत अशी आहे की सदर जागा हि बॉमबे ख्रिश्चन ट्रस्ट च्या मालकीची असून  श्री फ्रान्सिस फर्नांडिस हे लिझ होल्डर म्हणजे मालक होते ह्यांनी त्यांची मुलीला लिझ चे हक्क श्रीमती शैला अथायडे ह्यांना दिले होते म्हणजेच त्या ह्या जागेच्या खऱ्या मालक होत्या व त्यांनी सदर जागेसंबंधी  हक्क POA द्वारे त्यांचे भाऊ श्री व सौ फर्नांडिस ह्यांना दिले होते.  ह्या प्रकरणी कोर्टात फर्नांडिस कुटुंबीयांनी कन्सेंट टर्म्स फाईल करून  सर्वप्रथम मेसर्स पाल्म शेल्टर्स ह्या रहेजा बंधूंच्या कंपनीसोबत व्यवहार केला होता. त्यांनी 10 वर्षे काहीही काम केले नसल्यामुळे श्री व सौ फर्नांडिस हे नव्या डेव्हलपर्सच्या शोधात होते त्याकामी त्यांना श्री. फ्रेडरिक नर्होणा ह्या सोसायटीच्या सचिवांना नवीन डेव्हलपर शोधावा ह्यासाठी विनंती केली... त्यानुसार आमच्या मेसर्स परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या संपर्कात ते आले .. त्यांनी सर्व विषय मांडला. त्यानुसार फर्नांडिस कुटुंबियांना त्याच सोसायटीमध्ये इतरत्र फ्लॅट्स देण्याच्या करारानुसार आमच्या कंपनीने सर्व मोबदला हा  मेसर्स पाल्म शेल्टर्स व फ्रेडरिक नर्होणा ह्यांना दिला होता त्याबदल्यात सादर जागेसंबंधी सर्व हक्क आमच्या कंपनीस मिळाले होते. मोबदला दिल्यानंतर सप्टेंबर 2003 मध्ये श्री व सौ फर्नांडिस ह्यांनी आमच्या परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे रजिस्टर POA  सुद्धा केली होती. परंतु २००५ मध्ये आम्ही बांधकामास सुरुवात केल्यानंतर आमचे फ्रेडरिक नर्होणा ह्यांच्याशी पटत नाही ह्या कारणास्तव तो करार रद्द करावा अशी भूमिका घेतली. आम्ही फ्रेडरिक नर्होणा ह्यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे बांधकाम सुरु आहे व लवकरच त्यांना पझेशन देण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र फेड्रिक नारोना यांच्याकडून फ्लॅट घेण्याबाबत फर्नांडिस कुटुंबीयांनीच नकार दिला..

यानंतर आमचे कोणतेही देणं लागत नसताना माणुसकीच्या नात्याने फर्नांडिस कुटुंबीयांशी आम्ही वारंवार संपर्क केला. 2014 साली त्यांनी समक्ष भेटून फ्लॅट च्या मोबदल्यात पैसे देण्याचे आम्ही मान्य आणि त्यांनी देखील ते मान्य केले व त्यासाठी बॉम्बे ख्रिश्चन ट्रस्ट ला पत्र सुद्धा दिले कि परवेश कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या नावे लिझ ट्रान्सफर करावी. मात्र त्यावेळेस देखील फर्नांडिस यांनी व्यवहार पार पाडला नाही. आणि पुन्हा पैसे घेण्यास नकार दिला. 

नंतरच्या काळात आमच्यावर ओढवलेली संकटे पाहत याबाबत फर्नांडिस कुटुंबीय कोर्टात गेले मात्र कोर्टाने त्यांची याचीका फेटाळली आणि त्यांना ट्र्याबूनल (योग्य त्या कोर्टात दाद मागायला ) मध्ये जायला सांगितले मात्र त्यानंतर देखील त्यांनी ट्र्याबूनल मध्ये दाद मागितली नाही

दरम्यान अंजली दमानिया यांनी फर्नांडिस कुटुंबीयांना पुढे करून यात राजकारण करत राहिल्या त्यांना पुढे करून फर्नांडीस कुटुंबीयांना कोणताही लाभ घेऊ दिला नाही.आमची तयारी असताना देखील फर्नांडीस कुटुंबीयांनी व्यवहार पार पाडला नाही .

विशेष बाब  म्हणजे मागील वर्षी श्रीमती अंजली दमानिया ह्यांनी मा. सुप्रियाताई सुळे ह्यांच्या मार्फत संपर्क साधला व त्यांना मध्यस्ती करण्याची विनंती केली होती ह्याबाबत आम्हाला विचारणा केली असता आमचेकडूनही सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला,  त्यावेळी श्री. क्लाउड फर्नांडिस यांचे निधन झाल्याचे आम्हाला समजले तेव्हा सुरुवातीलाच रु. 50 लक्ष चा धनादेश आम्ही विनाअट देऊ केला तो त्यांनी स्वीकारला परंतु बँकेत जमा केला नाही किंवा त्यांना जमा करू दिला नसावा.  

सौ.सुप्रियाताई ह्यांच्या मध्यस्तीमुळे आणी श्रीमती फर्नांडिस ह्यांचे वय बघता जवळपास सर्व मागण्या किंवा त्यांनी करारानुसार पूर्तता करण्याच्या सर्व अटी-शर्ती आम्ही बाजूस सारून व वकिलांचे सल्ल्यांविरुद्ध फक्त रिलीझ डीड सारखे एखादे करारपत्र करावे व ED ट्रिब्युनल मध्ये परवानगीसाठी जावे लागू शकते त्यात त्यांनी सहकार्य करावे असे ठरले व त्यांच्या फ्लॅट च्या बदल्यात आर्थिक स्वरूपात मोबदला देण्याचे ठरले होते. मात्र आम्ही दिलेले पैसे देखील त्यांनी नाकारले.... 

याबाबत सध्या राज्यात ओबीसींची मोठी लढाई राज्याचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि आम्ही लढत आहोत काल झालेली सभा पाहता यात राजकारण करण्यासाठी अंजली दमानिया यांनी मीडिया स्टंट केला. आमचे देणे लागत नसतानाही माणुसकीच्या नात्यातून आम्ही मोबदला देण्याची तयारी दर्शविली मात्र तरी देखील दमानिया यात राजकारण आणून आपली पोळी भाजून घेत आहेत.

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget