Mumbai Bus Stop : मुंबईतील नव्या बस स्टॉपवरुन आनंद महिंद्रा यांच्याकडून आदित्य ठाकरे, इक्बाल सिंह चहल यांचं कौतुक
Mumbai Bus Stop :आनंद महिंद्रा यांनी ट्वीटद्वारे मुंबईच्या नवीन बसस्थानकांवरुन आदित्य ठाकरे आणि मनपा आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचं कौतुक केलं आहे. यावर आदित्य ठाकरे यांनीही उत्तर दिलं आहे.

मुंबई : देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक असलेल्या महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. अलीकडेच आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्वीटद्वारे मुंबईच्या नवीन बसस्थानकांचे कौतुक केलं आहे. आनंद महिंद्रा यांचं हे ट्वीट व्हायरल होत आहे. या ट्वीटमध्ये आनंद महिंद्रा यांनी आदित्य ठाकरे आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचेही बस स्टॉपबद्दल कौतुक केलं आहे.
आनंद महिंद्रा यांच्याकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक
महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी मुंबईच्या नवीन बस स्टॉप आणि आदित्य ठाकरे यांचे कौतुक केलं. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, "अखेर, मुंबईत जागतिक दर्जाचे बस थांबे असतील. व्यायाम बार आणि 'थंड' हिरवे छत यासारख्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह. हे पाहणे खूप छान आहे. ब्राव्हो आदित्य ठाकरे, इक्बाल सिंग चहल.
आदित्य ठाकरेंकडून आभार
आनंद महिंद्रा यांच्या या ट्वीटनंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांचं ट्वीट रिट्विट करत लिहिलं की, "आनंद महिंद्रा जी धन्यवाद. आपल्या शहरासाठी आरामदायी सार्वजनिक वाहतूक सुनिश्चित करणे आणि डिझाईनच्या सौंदर्याचा उत्तम अर्थ सुनिश्चित करणं हे त्यामागील उद्दिष्ट आहे. त्यामुळे आम्ही आमच्या बसच्या ताफ्यात एसी इलेक्ट्रिक बसची संख्या वाढवत असताना, बस स्टॉप सर्व लोकांसाठी अधिक चांगले असतील याची आम्ही खात्री करत आहोत.
Thank you @anandmahindra ji. The idea is to ensure comfortable public transport and a better sense of design aesthetic for our cities. So while we increase our AC electric bus fleet, we are also ensuring our bus stops get better, for all citizens ☺️🙏🏻 https://t.co/yPemMqtV0D
— Aaditya Thackeray (@AUThackeray) April 17, 2022
दरम्यान, मुंबईच्या नवीन बसस्थानकांचं कौतुक करणाऱ्या आनंद महिंद्रा यांचं हे ट्वीट व्हायरल झालं आहे. या ट्वीटला लोकांची खूप पसंती मिळत आहे. आनंद महिंद्राच्या या ट्वीटवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
























