एक्स्प्लोर

Sushant Singh Rajput | सुशांत सिंह प्रकरणावरुन अमृता फडणवीस, शिवसेना आमने-सामने!

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन अमृता फडणवीस आणि शिवसेना आमने-सामने आले आहे. अमृता फडणवीस यांच्या ट्विटला याला युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात आता विविध नेत्यांनी उडी घेतल्याने या प्रकरणाला राजकीय रंगही चढले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सुशात सिंह मृत्यूच्या तपासावरुन टीका केली. मुंबईने माणुसकी गमावली असून निरपराध आणि स्वाभिमानी लोकांसाठी राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नसल्याचं ट्वीट त्यांनी केलं आहे. याला युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई आणि राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी प्रत्युत्तर दिलंय.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा वाद रंगण्याची चिन्ह आहेत. कारण, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेले पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केलं. त्यावर बरीच चर्चा सुरु आहे. शिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. भाजप नेते राम कदम, किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी तपास यंत्रणेवर टीका केली. त्यातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही वक्तव्य करुन या प्रकरणात उडी घेतली आहे.

अमृता फडणवीस यांनी लिहिलं आहे की, "ज्या प्रकारे सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हाताळलं जात आहे, ते पाहून मला वाटतंय की मुंबईने माणुसकी गमावली आहे आणि निरपराध, स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी हे शहर सुरक्षित नाही. " या आरोपाला शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

वरुण सरदेसाई यांचा अमृता फडणवीसांवर निशाणा दरम्यान युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी अमृता फडणवीस यांच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. "मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर," असं त्यांनी लिहिलं आहे.

"मुंबई पोलिसांवर आरोप करुन त्यांना बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हान करते, की त्यांनी मुंबई पोलिसांनी दिलेली सुरक्षा व्यवस्था सोडून द्यावी आणि खाजगी संस्थांची सुरक्षा घ्यावी. माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने असे बोलणे दुर्दैवी आहे" असे ट्वीट राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं आहे.

CM Meeting | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, सुशांत आत्महत्याप्रकरणी चर्चेची शक्यता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget