Uddhav Thackeray: मोठी बातमी : मॉरिसने गोळ्या झाडल्याचं दिसत नाही, अभिषेक घोसाळकर प्रकरणात उद्धव ठाकरेंकडून मोठी शंका व्यक्त!
Uddhav Thackeray: कॅमेऱ्यामागून घोसाळकरांवर गोळ्या झाडणारी व्यक्ती मॉरिसच होता का? उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला वेगळाच संशय
![Uddhav Thackeray: मोठी बातमी : मॉरिसने गोळ्या झाडल्याचं दिसत नाही, अभिषेक घोसाळकर प्रकरणात उद्धव ठाकरेंकडून मोठी शंका व्यक्त! Uddhav Thackeray press conference slams Devendra Fadnavis over Mauris Noronha firing on abhishek ghosalkar Uddhav Thackeray: मोठी बातमी : मॉरिसने गोळ्या झाडल्याचं दिसत नाही, अभिषेक घोसाळकर प्रकरणात उद्धव ठाकरेंकडून मोठी शंका व्यक्त!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/10/b9ebe0fa43aa91817b0a80f9c27781c91707550412130954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडण्यात आल्या. मॉरिस नोरोन्हा या गुंडाने त्यांच्यावर गोळ्या झाडल्याचे सांगितले जाते. मात्र, फेसबुक लाईव्हमध्ये कॅमेऱ्याच्या मागून गोळ्या झाडणारी व्यक्ती नेमकी कोण होती, हे समजू शकलेले नाही. मॉरिस नोरोन्हाला अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर सूड उगवायचा होता मग त्याने स्वत:ही आत्महत्या का केली? हा एकूणच प्रकार संशयास्पद असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. ते शनिवारी मातोश्रीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील गुन्हेगारी घटनांच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी घोसाळकर मृत्यूप्रकरणाबाबत काही शंका व्यक्त केल्या. फेसबुक लाईव्हच्या व्हिडिओत मॉरिस (Mauris Noronha) गोळ्या झाडताना दिसत नाही. मॉरिस नोरोन्हा याच्याकडे परवानाधरक शस्त्र नव्हते. त्याने त्याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्र याच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे सांगितले जाते. मॉरिससारख्या गुंडाला अंगरक्षकाची गरज का लागावी? अमरेंद्र मिश्रा याच्या बंदुकीतून नेमक्या कोणी गोळ्या चालवल्या, हा प्रश्न अनुत्तरित आहे. कॅमेऱ्यामागून गोळ्या झाडणारी व्यक्ती मॉरिसच होता हे कशावरुन? हे प्रकरण वरकरणी वाटतं तितकं सोपं नाही. एकवेळ आपण मान्य करु की, मॉरिसने सूडाच्या भावनेतून घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या. मग त्याने स्वत: आत्महत्या का केली, हा प्रश्न आहे. आणखी कोणत्या व्यक्तीला मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्याची सुपारी देण्यात आली होती का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेले वक्तव्य निर्ढावलेपणाचे लक्षण होते. मी यापूर्वी देवेंद्र फडणवीसांसाठी 'फडतूस', 'कलंक' असे शब्द वापरले होते. मात्र, आता हे शब्दही सौम्य वाटतील, असे त्यांचे वर्तन असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात बेबंदशाही सुरु आहे. महाराष्ट्र कसा आहे, महाराष्ट्राची संस्कृती काय आहे, हे माहिती नसणारे निर्ढावलेपणाने काहीही बोलत आहे. या सगळ्या प्रकारामुळे महाराष्ट्रातील जनता दुखावली गेली आहे. राज्यात गुंडांचा हैदोस सुरु आहे. गेल्या दीड वर्षांपासून गुंडांना सरकारकडून संरक्षण मिळत आहे. हा प्रकार चिंताजनक आहे. राज्यात कायद्याचे धिंडवडे निघाले आहेत, अशी टीकाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.
आणखी वाचा
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, उद्धव ठाकरेंची पहिली मोठी मागणी
कलंक, फडतूस नव्हे हे तर मनोरुग्ण गृहमंत्री, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर जहरी वार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)