पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम; हवेमध्ये धुळीचे कण, नागरिकांमध्ये भीती
Dust storm north Konkan area include Mumbai : मुंबईत हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत.
Dust storm north Konkan area include Mumbai : पाकिस्तानमधील धुळीच्या वादळाचा मुंबईतील वातावरणावर परिणाम दिसून येत आहे. सकाळपासून मुंबईतील आणि आसपासच्या शहरांमधील दृश्यमानता अतिशय कमी झाली आहे. तर हवेमध्ये धुळीचे कण मिसळल्याने त्यात काल आणि आज पाऊस पडल्याने अनेक गाड्यांवर आणि वस्तूंवर पांढरे डाग दिसून येत आहेत. अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
धुळीचे वादळ पाकिस्तान मधील कराची मध्ये आले होते ते आता राजस्थान आणि गुजरात दिशेने सरकत आहे. त्यामुळेच वातावरणात सकाळपासून मळभ आणि धूळ दिसून येत आहे. मात्र या धूळ युक्त हवेचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्त्वाचे असून सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालवली
मुंबईतील हवा गुणवत्ता पातळी खालवल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील एकूण हवा गुणवत्ता निर्देशांक 180 वर आहे. मालाड आणि माझगावमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार झाला आहे. दोन्ही ठिकाणी हवेची गुणवत्ता अति खराब श्रेणीत, मालाडमध्ये एक्यूआय 316 तर माझगावमध्ये 315 एक्यूआय आहे. मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे तर अनेक ठिकाणी धुक्याचं चित्र आहे.
पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता
मुंबई, पुणे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता काल हवामान विभागाने वर्तवली होती. त्याप्रमाणे शनिवारी मध्यरात्री राज्यातील मुंबई, ठाणे पालघर आणि नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावमध्ये पावसाने हजेरी लावली.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या