आम्ही भाजप सोडून शिवसेनेत येतोय, भाजप, विहिंपचे कार्यकर्ते ठाकरे गटात, उद्धव ठाकरे म्हणाले, काही नालायकांकडून हिंदुत्व-भगव्यात भेद!
मुंबई : मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मुंबई उपनगरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला.
मुंबई : मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे (uddhav thackeray) ह्यांच्या हस्ते शिवबंधन बांधून मुंबई (mumbai News) उपनगरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला. भाजप उत्तर मुंबई जिल्हा सचिव प्रदीप उपाध्याय, विश्व हिंदू परिषदेचे घनश्याम दुबे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. ह्यावेळी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर प्रदिप उपाध्याय आणि घनश्याम दुबे यांनी भाजपवर हल्लाबोल केला. त्याशिवाय उद्धव ठाकरे यांनाही टीकास्त्र सोडलं.
काही नालायकांकडून हिंदुत्व-भगव्यात भेद!
काही नालायकांकडून हिंदुत्व-भगव्यात भेद केला जातोय, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला. भाजप, विहिंपच्या कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. त्यावेळी त्यांनी पक्षप्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर बोलताना भाजपवर हल्लाबोल केला. मन की बात नेहमीच होते, आता दिल की बात, असे म्हणत त्यांनी मोदींवरही निशाणा साधला.
मदत करताना भेदभाव करत नाही -
आम्ही कोणाला मदत केली हे आम्ही सांगत नाही. 92 नंतर मुंबईला शिवसैनिक आणि शिवसेनेनंच वाचवलं. दंगे होऊ देत, पूर येऊ देत, मदत करण्याचा शिवसैनिकांचा धर्म आहे. आम्ही मदत करताना भेदभाव करत नाही, असे ठाकरे म्हणाले.
त्यांनीच आता शिवसेना संपवायला घेतली -
प्रमोद महाजानांनी स्वत: ही आठवण सांगितलीय की एक काळ होता जेव्हा लोक स्वत:ला हिंदू म्हणवून घ्यायला घाबरायचे, बाळासाहेबांनी शिकवलं गर्व से कहो हम हिंदु है, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ही दूर्भाग्याची गोष्ट की जे पोळी भाजायला होते ते आता नाहीत आणि दुस-यांनी भाजलेल्या पोळीचा आस्वाद आणखी दुसरेच घेतायेत. ज्यांना बाळासाहेब आणि शिवसेनेनं वाचवलं त्यांनीच आता शिवसेना संपवायला घेतली, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
नालायकांकडून हिंदुत्व-भगव्यात भेद!-
आजच्या घडीला सत्तेपासून दूर होत विरोधकांकडे येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. मुंबईत लवकरच उत्तर भारतांचं संमेलन होईल. काही नालायक लोक हिंदुत्वात -भगव्यात भेद निर्माण करतायेत, असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. त्याशिवाय उद्धव ठाकरेंकडून जय श्रीरामचा नारा देण्यात आला.
भाजप सोडून शिवसेनेत येतोय - प्रदिप उपाध्याय
आम्ही भाजप सोडून शिवसेनेत येतोय. आम्ही संघ परिवारातून आलोय. आम्हाला संस्कारांसह कार्य करण्याची शिकवण दिली आहे. मात्र राममंदीर केवळ निवडणुकीकरता घडवलं जातंय.जे होतंय ते आम्हांला मान्य नाही, असे प्रदिप उपाध्याय म्हणाले.
उद्धव ठाकरेंना संकटकाळात सर्व जण सोडून देतायेत. मात्र आम्ही विश्व हिंदु परिषद, संघ परिवार , बजरंग दल या संघटनांचे सदस्य ,पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतोय, असेही ते म्हणाले.
भाजपचं हिंदुत्व केवळ दिखाव्याकरता आहे. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व हे शिवाजी महाराजांच्या विचारांतील हिंदुत्व आहे, असे घनश्याम दुबे म्हणाले.