एक्स्प्लोर

West Asia Crisis : पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मोठ्या उपाययोजना; परदेश दौरे रद्द, सार्वजनिक वाहतुकीवर भर

Maharashtra Fuel Saving Measures : पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने ऊर्जा बचत, इंधन वापरात कपात आणि अनावश्यक खर्च टाळण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

West Asia Crisis : पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशवासीयांना ऊर्जा बचत, सार्वजनिक वाहतुकीचा वापर, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने विविध विभागांसाठी महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. राज्याचे मुख्य सचिव राजेश अगरवाल (Rajesh Agrawal) यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या शासन परिपत्रकात परदेश दौऱ्यांवर निर्बंध, ऊर्जा बचत, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन आणि डिजिटल माध्यमातून बैठका घेण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

Maharashtra Foreign Tours Ban : शासकीय अधिकाऱ्यांचे परदेश दौरे तात्पुरते रद्द

राज्य शासनाने सर्व शासकीय अधिकाऱ्यांचे परदेश दौरे तात्पुरते रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या परदेश दौऱ्यांचे नियोजन टाळण्यास सांगण्यात आले असून अत्यावश्यक नसलेल्या खर्चांवर नियंत्रण ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

Public Transport Maharashtra : मेट्रो, लोकल आणि बसने प्रवास करण्याचे निर्देश

वाहनांच्या वापरात कपात करून कारपूलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस मुंबई मेट्रो (Mumbai Metro), मुंबई लोकल (Mumbai Suburban Railway) किंवा बसने प्रवास करावा, असं सूचविण्यात आलं आहे.

Maharashtra Video Conferencing : ऑनलाइन बैठकींवर भर

मंत्रालय, विभागीय आणि जिल्हा स्तरावरील बैठका, प्रशिक्षण आणि सेमिनार शक्य तितक्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यापीठे आणि महाविद्यालयांनाही या पद्धतीचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.

Maharashtra Energy Saving : ऊर्जा बचतीसाठी विशेष सूचना

कार्यालयांमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा वापर वाढवणे, अनावश्यक दिवे आणि उपकरणे बंद ठेवणे, तसेच वातानुकूलन यंत्रणेचे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसदरम्यान ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पीएम सूर्य घर योजना (PM Surya Ghar Yojana) अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्पांना गती देण्यावरही भर देण्यात आला आहे.

PNG Gas : पीएनजी गॅस आणि स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन

पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करून PNG गॅसचा वापर वाढवण्यासाठी प्रलंबित प्रस्तावांना तातडीने मंजुरी दिली जाणार आहे. मोठ्या शहरांतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनाही PNG वापरासाठी प्रोत्साहन दिले जाईल.

Maharashtra Natural Farming : नैसर्गिक शेती आणि खत वापरात कपात

कृषी क्षेत्रात रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक, जैविक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. माती परीक्षणावर आधारित पीकनिहाय मार्गदर्शन देण्यात येईल.

Maharashtra Government Spending : शासकीय खर्चावर मर्यादा

वाहन मिरवणुका आणि बाईक रॅलींना परवानगी नाकारली जाणार असून शासकीय जाहिराती आणि खर्चिक उपक्रमांवर नियंत्रण ठेवले जाईल. पुढील सहा महिन्यांसाठी सल्लागारांची नियुक्तीही टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Embed widget