एक्स्प्लोर

BMC : साडेआठ हजार कोटींची कामं रखडल्याचा आरोप निराधार; आदित्य ठाकरेंच्या आरोपानंतर महापालिकेचा खुलासा 

BMC On Aditya Thackeray Allegation : मुंबईकरांच्या दर्जेदार रस्ते निर्मितीसाठी महानगरपालिकेने सातत्याने पाठपुरावा केला असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी साडेआठ हजार कोटींची रस्तेकामे रखडल्याचा आरोप केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून (BMC) त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलेले सर्व आरोप हे निराधार असून वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. तसेच या आरोपानंतर मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांबाबत सद्यस्थितीदर्शक माहिती देण्यात आली आहे. 

महापालिकेने काय म्हटलंय?

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत रस्ते सुधारणांसाठी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या रस्ते कामांबाबत प्रसारमाध्यमांतून आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप निराधार आणि वस्तुस्थितीशी विसंगत असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारा 397 किलोमीटर अंतराच्या एकूण 910 रस्त्यांचे काँक्रिटीकरणा करीता जानेवारी 2023 मध्ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले असून सदर कामे पाच मोठ्या कंत्राटदारांमार्फत प्रगतिपथावर आहेत.

मुंबईतील पश्चिम उपनगरात एकूण 96 ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यातील 83 ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर आहेत व 13 ठिकाणी वाहतूक मार्गाकरीता खोदकाम प्रगतिपथावर आहे. लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्यात येईल.

मुंबईतील पूर्व उपनगरात एकूण 27 ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यातील 19 ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर आहेत. 8 ठिकाणी वाहतूक मार्गाकरीता खोदकाम प्रगतिपथावर असून लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्यात येईल.

शहर विभागातील कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. तिथेही लवकरच काम सुरु करण्यात येईल.

मुंबईकरांच्या दर्जेदार रस्ते निर्मितीसाठी महानगरपालिकेने सातत्याने या प्रकल्पासाठीचा पाठपुरावा केला आहे. या कॉंक्रिट रस्त्यांमुळे मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदा पावसाळ्यात देखील प्रकल्प रस्त्यांवरील खड्डे बुजवून नागरिकांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, यादृष्टीने खबरदारी घेत देखभालही केली आहे. 

काही प्रसारमाध्यमांमध्ये सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांच्या निमित्ताने करण्यात आलेले आरोप हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही. सबब, जनमानसात कोणताही गैरसमज पसरु नये, यासाठी सदर वस्तुस्थितीदर्शक खुलासा करण्यात येत आहे.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे? 

आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांवरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत त्या शहरांमध्ये घोटाळे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, शहरात सर्व मिळून साडेआठ हजार कोटींची कामे पडून आहे आणि ही रस्त्यांची काम होऊ नयेत यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी (Mumbai Police) एनओसी देऊ नये यासाठी त्यांच्यावर खोके सरकारकडून दबाव आहे. गेले 10 ते 12 महिने आम्ही रस्त्यांचा विषय मांडतोय. मुंबईत पाच पॅकेट कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांपैकी एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मीनेशन नोटीस गेली. या नोटिशीला कंत्राटदारानं उत्तर दिलं. त्याची सुनावणी महापालिकेत या आठवड्यात होणार आहे. या सुनावणीनंतर  कंत्राटदारावर कारवाई होते की खोके घेऊन कारवाई थांबवली जाते हे आम्हाला बघायचं आहे. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना
महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
Shaktipeeth : शक्तीपीठ महामार्ग विरोधात 1 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन,सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये: आमदार सतेज पाटील
मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करू नये; आमदार सतेज पाटील यांचा इशारा...
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Full PC : 6 जुलैला ठाकरे बंधू एकत्र दिसणार? हिंदीवरुन सरकारला घाम फोडणार?
Uddhav Thackeray PC : हिंदीची सक्ती ही भाषिक आणीबाणी! उद्धव ठाकरेंची स्फोटक पत्रकार परिषद
Latur Car Attack | लातूरमध्ये महिलेला अंगावर गाडी घालून जिवे मारण्याचा प्रयत्न
City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 26 June 2025
Dada Bhuse Meet Raj Thackeray | मनसेची आक्रमक भूमिका: शिक्षणमंत्री राज ठाकरेंची भेट घेणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना
महाराष्ट्रात विदेशी दारू उत्पादन करणाऱ्या प्रत्येक ब्रँडला प्रत्येक प्रशासकीय विभागात खास आउटलेटला परवानगी? उपसमितीची स्थापना
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
पुणेकरांचा नाद करती काय... नवरा बनला गावचा 'कारभारी'; बायकोने उचलून घेतलं खांद्यावरी
Shaktipeeth : शक्तीपीठ महामार्ग विरोधात 1 जुलैला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन,सरकारने शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये: आमदार सतेज पाटील
मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप करू नये; आमदार सतेज पाटील यांचा इशारा...
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
लोकांचा विरोध पाहता हिंदीचा दबाव टाकणं योग्य नाही, पहिलीपासून तीन भाषा दिल्या तर कठीण होईल : भुजबळ
राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको, पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे; सदावर्तेंचं गृहमंत्र्यांना पत्र
राज ठाकरेंच्या मोर्चाला परवानगी नको, पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यावे; सदावर्तेंचं गृहमंत्र्यांना पत्र
इंजिनियरिंगसाठी 28 जूनपासून प्रवेश, डिप्लोमासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; मंत्री चंद्रकांत पाटलांचा निर्णय
इंजिनियरिंगसाठी 28 जूनपासून प्रवेश, डिप्लोमासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ; मंत्री चंद्रकांत पाटलांचा निर्णय
रायगडमध्ये शिवसेनेबरोबर बिनसल्यावर शेकापशी हातमिळवणी करणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
रायगडमध्ये शिवसेनेबरोबर बिनसल्यावर शेकापशी हातमिळवणी करणार का? सुनिल तटकरे म्हणाले... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून  2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून  2025 | गुरुवार
Embed widget