एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nitesh Rane: दिशा सालियन प्रकरणात लहान मुलांचा काय रोल होता? नितेश राणेंचा आदित्य ठाकरे यांना सवाल

chhatrapati sambhaji nagar news: छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या हॉटेलबाहेर जोरदार राडा, भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार.

मुंबई: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन विरोधकांनी महायुती सरकारची कोंडी केली असताना आता भाजपने दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. आदित्य ठाकरे हे सध्या छत्रपती संभाजीनगर येथे आहेत. ते राहत असलेल्या रामा इंटरनॅशनल हॉटेलबाहेर सोमवारी भाजपचे कार्यकर्ते येऊन धडकले. तेव्हा त्याठिकाणी असलेल्या ठाकरे गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते. आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर येऊन ठाकरे गटाचे कार्यकर्ते तुटून पडले. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करुन दोन्ही बाजूचा जमाव पांगवला. यावेळी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनाही धक्काबुक्की झाली. त्यामुळे सध्या रामा इंटरनॅशनल हॉटेबाहेर तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणात नव्याने गंभीर आरोप केले आहेत.

दिशा सालियन हिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. यामध्ये आदित्य ठाकरे यांचाही सहभाग आहे. दिशा सालियन अत्याचार प्रकरणात लहान मुलांचा रोल काय होता, हा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारावा. उद्धव ठाकरे , आदित्य ठाकरे आणि त्यांच्या पक्षाचे नेते महिला अत्याचाराबाबत बोलतात. मग आदित्य ठाकरे यांना भाजपचे कार्यकर्ते दिशा सालियन प्रकरणावरुन त्यांना प्रश्न विचारत असतील तर त्यामध्ये गैर काय आहे? पण तिकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाली. आदित्य ठाकरे हॉटेलमध्ये  लपून बसलाय. त्याची बाहेर येण्याची का हिंमत झाली नाही? आदित्य ठाकरे हे दिशा सालियन प्रकरणाबाबत उत्तर देऊन आम्हाला गप्प का करत नाहीत, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. 

मात्र, अंबादास दानवे यांनी यावर भाजपवरच आगपाखड केली. दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मग भाजपने याबाबत गृहमंत्र्यांनाच याबाबत प्रश्न विचारावेत, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

दिशा सालियन प्रकरणाबाबत भाजपने केलेल्या आरोपांबाबत आदित्य ठाकरेंनी मोजक्या शब्दांत प्रत्युत्तर दिले.भाजपचे नेते ज्यांना घाबरतात, त्यांची बदनामी करण्याचे काम ते करतात, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. महाराष्ट्रात एका पोलीसावर कोयता गँगने हल्ला केला. आमच्या काळात असे कधी घडले नाही. पण आता पोलिसांवर हल्ले वाढले आहेत, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. बदलापूर घटनेतील वामन म्हात्रेंना भाजपने पक्षातून का काढलेले नाही. रस्त्यावर आंदोलन करणाऱ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल केले. पण बलात्कार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करायला पोलिसांना 10 दिवस लागले, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी नितेश राणेंची चौकशी; आदित्य ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
जनतेचा कौल मान्य, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची पालखी निष्ठेनं पुढे नेऊ, विधानसभेच्या निकालावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget