एक्स्प्लोर
Advertisement
खड्ड्यांनी त्रस्त अंबरनाथकरांची आमदाराविरोधात बॅनरबाजी
शहरातल्या रस्त्याची दूरवस्था झाली असून लोकांना त्यावरुन गाड्या चालवणं तर सोडाच, पण चालणंही मुश्किल झालं आहे.
अंबरनाथ : अंबरनाथ शहरात सध्या अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. अंबरनाथ आणि बदलापूरच्या वेशीवर असलेल्या फॉरेस्ट नाका परिसरात तर रस्ता पुरता खड्ड्यात गेला आहे. या रस्त्याची दूरवस्था काल 'एबीपी माझा'ने समोर आणली होती. यानंतर रात्री या भागात अज्ञातांनी बॅनर लावून स्थानिक शिवसेना आमदार बालाजी किणीकर यांना लक्ष्य केलं.
शहरातल्या रस्त्याची दूरवस्था झाली असून लोकांना त्यावरुन गाड्या चालवणं तर सोडाच, पण चालणंही मुश्किल झालं आहे. पण आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना मात्र याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त एसी गाडीतून फिरण्यासाठी निवडून दिलेलं नसून रस्त्याच्या दूरवस्थेकडेही लक्ष द्या, असा उपरोधिक टोला आमदारांना या बॅनरमधून लगावण्यात आला आहे.
याबाबत आमदार बालाजी किणीकर यांना विचारलं असता, हा कुणीतरी हा प्रकार मुद्दाम केला, असा दावा त्यांनी केला. तसंच या बॅनरबाजीबाबत माहिती घेऊ, असंही ते म्हणाले.
अंबरनाथचा फॉरेस्ट नाका परिसर हा अंबरनाथ आणि बदलापूरची वेस समजला जातो. या भागातून जाणारा रस्ता हा कल्याण-कर्जत राज्यमार्गाचा भाग असून यावरून रात्रंदिवस अवजड वाहनं, तसंच हलकी वाहनं आणि दुचाकींची ये-जा सुरु असते. मात्र पावसाळा सुरु झाल्यापासून या रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडले असून रस्ता कुठे आणि खड्डा कुठे, हेदेखील समजायला मार्ग नाही. अशा परिस्थितीत इथून गाड्या चालवताना वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन आणि तारेवरची कसरत करुन गाड्या न्याव्या लागतात.
त्यात भर म्हणून रस्त्यावर साचणारं पाणी वाहून जाण्यासाठी स्थानिकांनी भर रस्त्यात चर खोदली असून त्यात आदळून वाहनांचंही नुकसान होतं आहे. या रस्त्याची जबाबदारी एमएमआरडीएची असून त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष केलं जातंय. त्यामुळे हा त्रास लवकरात लवकर थांबवा, अशी कळकळीची मागणी वाहनचालक करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
भविष्य
बॉलीवूड
Advertisement