एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

अमरनाथ अतिरेकी हल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींवर 'सामना'तून टीका

मुंबई : अमरनाथच्या यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरुन शिवसेनेने पक्षाचं मुखपत्र 'सामना'तून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. हिंदुत्ववादी सरकार असतानाही काश्मीर खोऱ्यातील चित्र बदललं नसल्याचा टोला 'सामना'तून लगावला आहे. जवानांचे हौतात्म्य आणि निरपराध्यांचा रक्तपात का थांबलेला नाही, याचं उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प किंवा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन देऊ शकणार नाहीत, अशी टीकाही करण्यात आली. काय म्हटलं आहे 'सामना'त? हिंदुस्थानी राज्यकर्त्यांच्या धमक्यांना आणि डरकाळ्यांना आपण जुमानत नसल्याची बांग ठोकून अमरनाथ यात्रेकरुंचे हत्याकांड घडले आहे. हे सर्व काँग्रेस राजवटीत घडत होते म्हणून हिंमतवाल्यांचे राज्य देशातील जनतेने आणले आहे, पण राज्य बदलल्याचे चित्र कश्मीर खोऱ्यात तर अजिबात दिसत नाही. आज देशाला खरे तर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत आहे. अमरनाथ यात्रा उधळून लावण्याची बांग कश्मीरातील अतिरेक्यांनी ठोकताच मुंबईतून शिवसेनाप्रमुख उसळून म्हणाले होते, ‘‘याद राखा! माझ्या एका जरी हिंदू अमरनाथ यात्रेकरुंच्या केसाला धक्का लागला तर देशातून ‘हज’चे एकही विमान उडू देणार नाही. गाठ माझ्याशी आहे!’’याला म्हणतात गर्जना! शिवसेनाप्रमुखांच्या गर्जनेनंतर अतिरेक्यांनी शेपूट घातले ते घातलेच व अमरनाथ यात्रा पुढची २०-२१ वर्षे सुरळीत पार पडली. आज पुन्हा अतिरेकी मोकाट सुटले आहेत. मोदीजी, त्यांना आवरा हो! हिंदुस्थानचे पंतप्रधान नुकतेच चार-पाच देशांच्या दौऱ्यावर जाऊन आले. परकीय भूमीवर जाऊन त्यांनी हिंदुस्थानच्या भूमीवरील दहशतवादावर चिंता व्यक्त केली. मित्रराष्ट्रांच्या (?) मदतीने दहशतवादाशी लढण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला. मात्र त्याच वेळी इकडे कश्मीरात नऊ निरपराध्यांच्या हत्येने देश हादरला आहे. हिंदुस्थानी राज्यकर्त्यांच्या धमक्यांना आणि डरकाळ्यांना आपण जुमानत नसल्याची बांग ठोकून अमरनाथ यात्रेकरुंचे हत्याकांड घडले आहे. केंद्रात मोदींचे मजबूत व जम्मू-कश्मीरात पीडीपी-भारतीय जनता पक्षाचे पोलादी राज्य असताना रक्तपाताचा महापूर यावा याची चिंता आम्हाला आहे. कश्मीर खोऱ्यात आज कोणाचेही राज्य नसून तिथे दहशतवाद व हिंसाचाराचे थैमान घालणारे अतिरेक्यांचे सरकार सुरु आहे. हे अतिरेक्यांचे सरकार खतम करण्यासाठी आज ५६ इंच पोलादी छातीचे राज्य हवे. मोदी यांच्या रुपाने ते लोकांनी आणले असले तरी कश्मीरातील जवानांचे हौतात्म्य व निरपराध्यांचा रक्तपात का थांबलेला नाही, याचे उत्तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिनसाहेब देऊ शकणार नाहीत. हे उत्तर आपल्यालाच द्यावे लागेल. अर्थात केंद्र सरकारने अमरनाथ यात्रेवरील हल्ल्यावरून तशी ‘चोख’ उत्तरे लगेच ‘ट्विटर’वरुन दिली आहेत. हिंदुस्थान घाबरणार नाही, झुकणार नाही असे सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांनीदेखील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र हे अमानुष हल्ले थांबविण्याची हिंमत आज कोणात आहे? कश्मीरातील अमानुष हत्याकांडानंतर सरकारने एक केले ते म्हणजे नेहमीप्रमाणे ‘हाय अलर्ट’चा इशारा देऊन दिल्लीची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. ही व्हीआयपींच्या सुरक्षेची सोय झाली, पण फक्त दुःख व्यक्त करुन, कागदी निषेध करुन आपण अतिरेक्यांशी कसे लढणार? कश्मीरातील राज्य व्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे. जवानांवर हल्ला करणाऱ्यांना सरकारी मदत मिळते व लष्करी हल्ल्यात मारल्या गेलेल्या बुरहान वाणीच्या कुटुंबास सरकारी तिजोरीतून घसघशीत नुकसानभरपाई देण्याचे पापही केले जाते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 2 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  2 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 2 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
'मागच्या रस्त्याने येऊन, evm मॅन्यूपुलेट करून..' पराभवानंतर चिंतन बैठकीतच प्रणिती शिंदेंचा ब्लेम गेम‌? म्हणाल्या..
IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
ॲडलेड कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-11 फिक्स, 'या' खेळाडूंसोबत रोहित शर्मा उतरणार मैदानात
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
Embed widget