एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

... तर पुढच्या शंभर वर्षांत 40 टक्के मुंबई पाण्याखाली बुडालेली असेल!

मुंबई : मुंबईतील 26 जुलैच्या महाप्रलयाच्या वेदनादायी आठवणींची सल मनात ठेवणाऱ्या मुंबईच्या उंबरठ्यावर आणखी एक मोठं संकट येऊन उभं राहतंय. हे संकट सरळसोट मुंबईवर आक्रमण करणार नाही, तर कसलाही आवाज न करता, कुठलीही कल्पना न देता मुंबापुरीला आपल्या बाहूपाशात ओढणारं आहे. त्यामुळे वेळेत उपाययोजना केल्या नाहीत, तर पुढच्या शंभर वर्षांत 40 टक्के मुंबई पाण्याखाली बुडालेली असेल. मुंबईतील वातावरण बदलावर झालेल्या एका रिसर्चमध्ये ही महाभयंकर भीती वर्तवली गेली आहे. मुंबईच्याच मानगुटीवर बसलेलं हे संकट नाही तर गेली काही वर्ष सातत्याने जगात समुद्रांच्या पातळीत वाढ होत आहे. जर समुद्राच्या पाण्याची पातळी अशीच वाढत राहीली तर सुमारे 40 टक्के मुंबई पुढील 100 वर्षात पाण्याखाली जाण्याची भीती वर्तवली गेली आहे. मुंबईला नेमका धोका काय? भुवनेश्वरमध्ये इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटीतर्फे ट्रॉपमेट हे राष्ट्रीय चर्चासत्र झालं. या चर्चासत्रात एका शोधनिबंधावर चर्चा झाली. त्यात या धोक्याची जाणीव करुन देण्यात आली आहे. हवामान बदलाचे मुंबईवर होणारे परिणाम या विषयासंदर्भातला हा शोधनिबंध होता. मुंबईच्या 458.53 चौरस किलोमीटरपैकी 190 चौरस किलोमीटर क्षेत्राला शंभर वर्षांत जलसमाधी मिळू शकते, अशी भीती या शोधनिबंधात व्यक्त करण्यात आली आहे. समुद्र दरवर्षी तीन मिलीमीटर मुंबईच्या किनारपट्टीकडे सरकतोय, असं निरीक्षणही त्यात नोंदवलंय. समुद्राची पातळी वाढण्याची प्रक्रिया जागतिक आणि स्थानिक पातळीवरच्या कारणांमुळे होत आहे. समुद्रजलाची खोली, पातळी आणि तापमान, क्षारता, घनता बदलल्यामुळे प्रवाळ, जलजशैव आणि शेलफिश अस्तंगत होण्याचा धोकाही वाढेल. भविष्यातल्या समुद्रपातळीच्या वाढीच्या संदर्भात विकासकामे, वस्त्या यांचं फेरनियोजन करणं आता आवश्‍यक आहे. यासाठी माणसाने समुद्राच्या म्हणजेच किनारी भागातल्या पर्यावरणात चालवलेली ढवळाढवळ कमी करणं आणि हवेचं प्रदूषण कमी करणं हा दुसरा उपाय आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे शास्त्रज्ञ आर. मनी मुरली यांनी रियास एमजे, रेशमा केएन आणि संतोष कुमार यांच्या सहकार्याने हा शोधनिबंध तयार केला आहे. यातील निष्कर्ष खूप महत्त्वाचे आणि गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यामुळे वैज्ञानिक मंडळी त्यातील निष्कर्षांचा आढावा घेत आहेत. निसर्गाचा गळा घोटत केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, मानवी सुविधांसाठी पर्यावरणाला नख लावण्याच्या धोरणांचा पुनर्विचार करायची वेळ येऊन ठेपली आहे. कारण मुंबईच्या अंगणात पसरलेल्या सागराचा प्राण तळमळला तर चोरपावलांनी मुंबईला तो कवेत घेण्याचा धोका नाकारता येत नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाणAjit Pawar Gat Mantri list : भुजबळ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणारSpecial Report : Solapur Voting On Ballet Paper : 'बॅलेट'साठी झेलू 'बुलेट'; मारकडवाडीत चाललंंय काय?Special Report : Mahayuti Mantripad : मंत्रीपदाची परीक्षा..कोण पास, कोण नापास? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल
Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget