एक्स्प्लोर

सीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघलांचा पळ, तर आयुक्त अजॉय मेहतांचा पत्ता नाही

सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेबाबत विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी पालिका अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु पालिकेचे अधिकारी याबाबत बोलणे टाळत आहेत. तर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल हे माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून पळ काढत असल्याचे आज पाहायला मिळाले.

मुंबई : गुरुवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. त्यामध्ये 6 पादचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. हा पूल मुंबई महापालिकेचाच असल्याचे महापालिकेने कबूल केले आहे. या घटनेबाबत विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी पालिका अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु पालिकेचे अधिकारी याबाबत बोलणे टाळत आहेत. तर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल हे माध्यमांच्या प्रतिनिधींना पाहून पळ काढत असल्याचे आज पाहायला मिळाले. दरम्यान महापालिकेचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने दुर्घटनेची कोणतीही जबाबदारी पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी स्वीकारलेली नाही. दुर्घटना घडून एक दिवस उलटलेला आहे, तरी अद्याप पालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारली नाही. आयुक्तांनी केवळ दक्षता विभागाला चौकशीचे आदेश दिले आहेत. 24 तासांत अहवाल द्या, असे फर्मान त्यांनी दक्षता विभागाला सोडलं आहे. परंतु अजॉय मेहता माध्यमांसमोर येण्यास तयार नाहीत, तर अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल हे माध्यमांना पाहून पळ काढत आहेत. दरम्यान अजॉय मेहता यांना अटक करण्याची मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. काल (गुरुवारी )संध्याकाळी घडलेल्या या दुर्घटनेनंतर स्थानिक नगरसेविका सुजाता सानप आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा पूल रेल्वेचा असल्याचे सांगून दुर्घटनेची जबाबदारी नाकारली. त्यानंतर हा पूल पालिकेचाच असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. घटनेनंतर अडीच तासांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कबूल केले की तो पूल पालिकेचाच आहे. पालिका एवढ्यावरच थांबलेली नाही, तर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही. तसेच हे अधिकारी या घटनेबाबत बोलणेदेखील टाळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; 2 जणांचा मृत्यू, अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Embed widget