एक्स्प्लोर

Adulterated Ghee : ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईतून सुमारे तीन लाखांचे भेसळयुक्त तूप जप्त

Adulterated Ghee : मुंबईतून सुमारे तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

Adulterated Ghee : ऐन दिवाळीच्या (Diwali 2022) तोंडावर मुंबईतून (Mumbai) सुमारे तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप (Adulterated Ghee)जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) ही कारवाई केली आहे. दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयाने अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली आहे.

मस्जिद बंदर इथे गोदामावर कारवाई
मुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागाला 18 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार मस्जिद बंदर इथल्या ऋषभ शुद्ध तूप भांडार गोडाऊनवर ही कारवाई करण्यात आली. गोदामातून 2 लाख 99 हजार 90 रुपये किंमतीचा 400 किलो तूप जप्त करण्यात आला आहे. यासोबतच तुपाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. हे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल.

दिवाळीसारख्या सणाच्या दिवसात ग्राहकांना सुरक्षित आरोग्यदायी आणि सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न नमुने तपासण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसंच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिले आहेत.

दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांची विक्री
दिवाळीच्या दिवसांमध्ये मिठाईंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने त्याचा गैरफायदाही घेतला जातो.  यामुळे या मिठाईत बनावट पदार्थ मिसळण्याची शक्यताही असते. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासून किंवा शुद्ध तुपापासूनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नसते. अशातच व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त आणि बनावट पदार्थ ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. या वस्तूंमुळे आरोग्यास मोठा धोका होऊ शकतो.

पुण्यातील दौंडमध्ये भेसळयुक्त गूळ जप्त
अन्न व औषध प्रशासनाने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील गूळ उत्पादकांवर मोठी कारवाई केली होती. दौंड तालुक्यातील दापोडी आणि केडगाव येथील तीन गूळ उत्पादकांवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे पाच लाख 33 हजार 870 रुपये किंमतीचा भेसळयुक्त गुळ आणि साखर जप्त करण्यात आली आहे.

अकोल्यात भेसळयुक्त मिठाई जप्त
दरम्यान पाच दिवसांपूर्वीच म्हणजे 14 ऑक्टोबर 2022 रोजी अकोला इथल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन विविध ठिकाणी कारवाई करत 1 लाख 6 हजार 600 रुपये किंमतीची 486 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त केली होती. 

इतर महत्त्वाची बातमी

Food and Drug Administration Action : पुणे जिल्ह्यातील तीन गूळ उत्पादकांवर कारवाई, पाच लाखाहून अधिक किंमतीचा भेसळयुक्त गुळ जप्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget