एक्स्प्लोर
संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर सेनाभवनाबाहेर शिवसैनिकांचा पहारा

मुंबई : संभाजी ब्रिगेडच्या धमकीनंतर शिवसैनिक दादरच्या शिवसेना भवनाजवळ पहारा देत आहेत. शिवसेना भवनावरचं बाळासाहेब ठाकरेंचं चित्र काढून टाका, असा धमकीवजा इशारा संभाजी ब्रिगेडकडून देण्यात आला होता. शिवसेना भवनाच्या इमारतीवर शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि त्यावर बाळासाहेबांचं मोठं चित्र आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या वर असलेल्या बाळासाहेबांच्या चित्रावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे. त्यामुळे हे चित्र हटवा असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा रात्रीच हटवला होता. त्याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर आता शिवसैनिक रात्रभर पहारा देत आहेत.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा






















