एक्स्प्लोर
हेलिकॉप्टरमधून मुंबई दर्शन, गुढीपाडव्यापासून हवाई सफर
मुंबई : गुढीपाडव्यापासून मुंबईकरांना हवाई सफरीचा अनुभव घेता येणार आहे. मुंबई विद्यापीठ आणि पवनहंस यांनी नुकताच यासंदर्भात सामंजस्य करार केला. त्यानुसार मुंबई विद्यापीठातील हेलिपॅडवरुन हेलिकॉप्टरने या जॉयराईडचा आनंद घेता येणार आहे.
प्रत्येकी 3 हजार 400 रुपयांचं तिकीट काढून तुम्हाला मुंबईची हवाईसफर करता येईल. विशेष म्हणजे या तिकिटावर विद्यार्थ्यांना दहा टक्के आणि सामाजिकदृष्ट्या वंचित गटातील विद्यार्थ्यांना 25 टक्के सवलत असेल.
दर रविवारी ही सफर आयोजित केली जाईल, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी दिली. त्यामुळे या हवाई सफरीला मुंबईकरांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
बॉम्बे फ्लाइंग क्लबसोबत सुरु असलेल्या वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी पालघरमध्ये धावपट्टी बांधण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने मांडला आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे पालघरमधील 200 एकर जागेची मागणी विद्यापीठाने केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
व्यापार-उद्योग
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement