एक्स्प्लोर
‘त्या’ वक्तव्यामुळे राज ठाकरेंविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार
देशातली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी येत्या एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल, असे भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्धापन दिनानिमित्त केले होते. एस. बाल. कृष्णन यांनी यावर आक्षेप घेत पोलिसात तक्रार केली आहे.
![‘त्या’ वक्तव्यामुळे राज ठाकरेंविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार Advocate s balakrishnan give complaint against Raj Thackera in chembur police station ‘त्या’ वक्तव्यामुळे राज ठाकरेंविरोधात चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/12072444/raj.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात केलेल्या वक्तव्याविरोधात जेष्ठ पत्रकार आणि वकील एस. बाल. कृष्णन यांनी तक्रार दाखल केली आहे. चेंबूर पोलीस ठाण्यात एस. बाल. कृष्णन यांनी याबद्दल तक्रार अर्ज दाखल केला.
देशातली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी येत्या एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला पुन्हा एकदा घडवला जाईल, असे भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे वर्धापन दिनानिमित्त केले होते. याच वक्तव्यावर आक्षेप घेत एस. बाल. कृष्णन यांनी पोलिसात तक्रार केली आहे.
राज ठाकरे यांनी या अगोदर कोल्हापूर येथील सभेत देखील असेच वक्तव्य केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा घडवला जाऊ शकतो असे भाकीत त्यांनी केले आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर पोलिसांनी अथवा गुप्तचर यंत्रणांनी त्याची कोणतीही चौकशी केली नाही. म्हणून एस बालकृष्णन यांनी रविवारी या विरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तरी देखील पोलिसांनी राज ठाकरेंच्या विरोधात कारवाई केली नाही तर कोर्टात याचिका दाखल करण्याचा इशारा एस. बाल. कृष्णन यांनी यावेळी दिला आहे.
VIDEO | निवडणुकांपूर्वी पुलवामासारखा आणखी एक हल्ला होणार, राज ठाकरेंचा निशाणा | मुंबई | एबीपी माझा
मनसेच्या वर्धापन दिनाच्या सभेत राज ठाकरे काय म्हणाले?
मनसेच्या वर्धापन दिनाच्या सभेत राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच राजकीय स्ट्राईक केला. राज म्हणाले की, "मोदी म्हणतात आपल्याकडे राफेल असतं तर खूप मदत झाली असती, असे म्हणून मोदींनी एअर स्ट्राईक करण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या आपल्या जवानांचा अपमान केला आहे. मोदी म्हणतात सीमेवरील जवानापेक्षा व्यापारी जास्त रिस्क घेतात, जवानांपेक्षा व्यापारी जास्त शूर असतात, असे बोलायला मोदींना लाज कशी नाही वाटली?"
राज म्हणाले की, "एअर स्ट्राईकवेळी भारताकडे राफेल विमान असतं तर खूप फायदा झाला असता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, असं बोलून मोदी आपल्या जवानांच्या शौर्याचा अपमान करत आहेत. मोदी असं बोलून राफेल घोटाळा झाकू पाहत आहेत."
राज ठाकरे भाषण करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी आले होते. राज यांनी भाषणात जे आरोप केले, जे भाष्य केले, त्या प्रत्येक गोष्टीचे पुरावे सादर केले. राज यांनी प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून पुरावे सर्वांसमोर मांडले.
संबंधित बातम्या
अजित डोवालांच्या मुलाची पाकिस्तानी व्यापाऱ्यासोबत भागीदारी, राज ठाकरेंनी दाखवले पुरावे
निवडणूक जिंकण्यासाठी एक-दोन महिन्यात पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल : 'राज'कीय स्ट्राईक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)