एक्स्प्लोर
अदिती तटकरेंकडून शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी भागवतांना आमंत्रण
एकीकडे राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला कडाडून विरोध करतो. शरद पवार भाजप आणि संघाविरोधात बोलतात
![अदिती तटकरेंकडून शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी भागवतांना आमंत्रण Aditi Tatkare invites RSS chief Mohan Bhagwat for Shivaji Maharaj death anniversary program at Raigad fort अदिती तटकरेंकडून शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी भागवतांना आमंत्रण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/30112013/Aditi-Tatkare-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : येत्या 31 मार्चला रायगड किल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांची कन्या अदिती तटकरे यांनी शिवपुण्यतिथीचं आयोजन केलं आहे. मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांवरुन हा कार्यक्रम चर्चेत आला आहे.
कारण प्रमुख पाहुणे म्हणून चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलं आहे. शिवाय पत्रिकेत मोहन भागवत यांचा पूजनीय म्हणूनही उल्लेख आहे.
एकीकडे राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेला कडाडून विरोध करतो. शरद पवार भाजप आणि संघाविरोधात बोलतात. पण दुसरीकडे अदिती तटकरे मोहन भागवत, आमदार रवींद्र चव्हाण यांना कार्यक्रमाला निमंत्रण देतात. तसंच मोहन भागवत यांचा पूजनीय असा उल्लेख करतात.
मागच्या वर्षी सुनील तटकरे यांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांना अमंत्रण देण्यात आलं होतं, त्यावरही वाद झाला होता. त्यावेळी अजित पवार यांनी स्वतः सांगितलं होतं की कार्यक्रमांना मुख्यमंत्री, भाजपच्या मंत्र्यांना बोलावणार नाही.
पण आता अदिती तटकरे यांनी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाला मोहन भागवत यांना बोलवल्याने हा कार्यक्रम पुन्हा चर्चेत आला आहे.
![अदिती तटकरेंकडून शिवपुण्यतिथी कार्यक्रमासाठी भागवतांना आमंत्रण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/30110903/Shiv-Punyatithi.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
पुणे
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)