एक्स्प्लोर
Advertisement
मी पक्षात सुरक्षित नाही, अभिनेत्रीचा भाजपला रामराम!
उन्नाव आणि कठुआ गँगरेपसारख्या घटना पाहता, एक महिला म्हणून मी भाजपत सुरक्षित नाही, असं मल्लिका राजपूतने म्हटलं आहे.
मुंबई: अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत रिव्हॉल्वर राणी सिनेमात झळकलेल्या मल्लिका राजपूत या अभिनेत्रीने भाजपला रामराम ठोकला आहे. महत्त्वाचं म्हणजे अभिनेत्री मल्लिका राजपूतने, स्त्री सुरक्षेचं कारण देत, आपण भाजपमध्ये सुरक्षित नसल्याचं म्हटलं आहे.
मल्लिका राजपूत उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरची रहिवासी आहे. भाजपचे राज्यसभा खासदार ओम माथूर यांच्यासह ती भाजप यूथ विंग महाराष्ट्रसाठी काम करत होती.
उन्नाव आणि कठुआ गँगरेपसारख्या घटना पाहता, एक महिला म्हणून मी भाजपत सुरक्षित नाही, असं मल्लिका राजपूतने म्हटलं आहे.
‘हिंदू-मुस्लिम दंगली घडवणारा पक्ष’
राजकीय पोळी भाजण्यासाठी जो पक्ष (भाजप) हिंदू-मुस्लिम दंगली भडकवू शकतो, तो पक्ष महिलांचाही प्रयोग म्हणून वापर करु शकेल, असा घणाघात, मल्लिकाने केला.
कोण आहे मल्लिका राजपूत?
- मल्लिका राजपूत ही नुकत्याच आलेल्या रिव्हॉल्वर राणी या सिनेमात अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत दिसली होती.
- याशिवाय गायक शानसोबत ‘यारा तुझे नाम से’ हा अल्बमही काढला आहे.
- मल्लिका राजपूतने जावेद अलीसाठी 2013 मध्ये सव्वा तासाचं गाणं ‘तेरी आखिर’ लिहिलं होतं. त्यासाठी तिचं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदलं गेलं.
- मल्लिका राजपूतने 6 हजारपेक्षा जास्त गझल लिहिल्या आहेत.
- मल्लिकाचा हंसराज हंससोबत 'एक इशारा' हा अल्बमही रिलीज झाला होता.
- मल्लिका 2014 च्या लोकसभा निवडणुकीत, अभिनेता रवी किशनसाठी काँग्रेसचा प्रचारार्थ उतरली होती.
- मात्र प्रामाणिक पक्षाची गरज आहे म्हणत तिने भाजपमध्ये प्रवेश केला होता.
- मल्लिकाने 26 ऑगस्ट 2016 रोजी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं होतं.
- मात्र आता तिने भाजपला रामराम ठोकला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement