एक्स्प्लोर

पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या 'लालबागचा राजा'च्या कार्यकर्त्यांवर कारवाई होणार

‘लालबागचा राजा’ गणेश मंडळातील पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार आहे. रविवारी गणेश विसर्जनानंतर कारवाई करण्याचे मुंबई पोलिसांनी आदेश दिले आहेत.

मुंबई | ‘लालबागचा राजा’ गणेश मंडळातील पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई होणार आहे. रविवारी गणेश विसर्जनानंतर कारवाई करण्याचे मुंबई पोलिसांनी आदेश दिले आहेत. पोलिसांनी मंगळवारी 18 सप्टेंबरला झालेल्या बाचाबाचीचं सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेतलं आहे. त्याची नीट पडताळणी करुन गणेश विसर्जनानंतर संबंधित मुजोर कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनावेळी मंगळवारी 18 सप्टेंबर रोजी दुपारी पोलीस आणि लालबाग राजा मंडळाचे कार्यकर्ते यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यामुळे काही काळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. ज्या लालबागच्या राजासमोर सुख-शांती मागण्यासाठी भक्त जातात. तिथेच राडा सुरु झाला होता. कारण अत्यंत किरकोळ होतं. मंगळवार हा गणपतीचा वार आणि तोच मुहूर्त साधून लालबागच्या दरबारात भक्तांची तुडुंब गर्दी झाली. त्याच गर्दीला आवरत असताना पोलिसांचा धक्का मंडळाच्या खजिनदार मंगेश दळवी यांना लागला आणि तिथेच ठिणगी पडली. यानंतर बाचाबाची सुरु झाली आणि गोंधळ उडाला. कार्यकर्ते पोलिसांवर धावून गेले. यावेळी डीसीपी अविनाश कुमारही उपस्थित होते. त्यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही बाजूने धक्काबुक्की सुरु झाली आणि एकच संतापाचं वातावरण बाप्पाच्या दरबारात पाहायला मिळालं. लालबागच्या दरबारात हा असा राडा होण्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही महिला भक्तांना लालबागच्या मंडपात धक्काबुक्की झाल्याचे व्हिडीओ समोर आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा असा प्रकार समोर आल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Wankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget