जमावबंदीच्या आदेशाने पालन न केल्यास कारवाई करावी लागेल : आरोग्यमंत्री राजेश टोपे
जनतेने स्वत:हून सरकारच्या सूचनांचं पालन करावं. असं न केल्यास नाईलाजाने जमावबंदीचे आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (रविवार) राज्यात लॉकडाऊनची घोषणा केली. संपूर्ण महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही आज मुंबईच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केलं आहे. जनतेने स्वत:हून सरकारच्या सूचनांचं पालन करावं. असं न केल्यास नाईलाजाने जमावबंदीचे आदेश मोडणाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी धोकादायक असलेल्या जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्याचा विचार आहे. ज्या राज्यापासून अधिक धोका वाटतो, त्या राज्याच्या सीमा देखील बंद करण्याचा लवकरच निर्णय घेणार असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी- मुंबई - 38
- पुणे मनपा - 16
- पिंपरी चिंचवड मनपा - 12
- नागपूर- 4
- यवतमाळ - 4
- नवी मुंबई - 4
- कल्याण - 4
- अहमदनगर - 2
- पनवेल - 1
- ठाणे - 1
- उल्हासनगर - 1
- औरंगाबाद - 1
- रत्नागिरी - 1
- Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू
- Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची
- coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती
- Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद























