एक्स्प्लोर
फळ-भाज्या गटारात ठेवणाऱ्या फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल होणार
वाकोला भागातील फेरीवाले भाज्या आणि फळं गटारीत लपवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता महापालिकेने त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.
मुंबई : वाकोला भागातील फेरीवाले भाज्या आणि फळं गटारीत लपवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता महापालिकेने त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे.
या भागात बसणाऱ्या फेरीवाल्यांचा माल पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जप्त केला आहे. तसेच या फेरीवाल्यांवर गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे.
या भागात फेरीवाल्यांना बसण्यास परवानगी नसल्याने कारवाई टाळण्यासाठी वाकोल्यातील फेरीवाले फळ-भाज्यांच्या पेट्या चक्क गटारात लपवायचे. पालिकेची गाडी येण्याआधी फेरीवाले आपल्या भाज्या इतर माल या गटारीत लपवून पसार व्हायचे.
हा सर्व प्रकार मागील तीन महिन्यापासून सुरु होता. अखेर सोशल मीडियावर या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही संपूर्ण घटना समोर आली.
केवळ एकच फेरीवाला नव्हे तर रांगेने सर्वच फेरीवाले अशा प्रकारे गटारात माल ठेवत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे या सर्वच फेरीवाल्यांवर आता पालिकेकडून कारवाई केली जाणार आहे.
VIDEO :
संबंधित बातम्या :
फळ-भाज्यांच्या पेट्या गटारात, फेरीवाल्यांचा मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
Advertisement