एक्स्प्लोर
प्रेयसीच्या पतीला फसवण्यासाठी बनाव, शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्या प्रियकराला बेड्या
शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रेमसंबंधातून प्रेयसीच्या पतीला फसवण्यासाठी हा बनाव केल्याची माहिती आहे.
![प्रेयसीच्या पतीला फसवण्यासाठी बनाव, शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्या प्रियकराला बेड्या accused arrested for keeping suspicious material in Shalimar Express from akola प्रेयसीच्या पतीला फसवण्यासाठी बनाव, शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्या प्रियकराला बेड्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/05145807/Shalimar-Express.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनल्समध्ये यार्डात उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं ठेवणाऱ्या आरोपीला टिळक नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आनंद वानखेडे असं या तरुणाचे नाव असून त्याने प्रेमसंबंधातून प्रेयसीच्या पतीला फसवण्यासाठी हा बनाव केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अकोल्यातून आरोपीला अटक करण्यात आली आहे. उद्या शुक्रवारी या आरोपीला पोलीस मुंबईत घेऊन येणार आहेत. त्यानंतरच संपूर्ण घटनेचा उलगडा होणार आहे. मुंबईत शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या सापडल्यानं काल बुधवारी खळबळ उडाली होती. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे कारशेडमध्ये उभ्या एक्स्प्रेसमध्ये सफाई सुरु असताना या कांड्या सापडल्या होत्या. बॉम्बशोधक पथकाकडून स्फोटकाला पुष्टी मिळाली होती. त्यानंतर ही स्फोटकं निकामी करण्यात आली.
स्फोटकांसोबतच भाजप सरकारविरोधात काही पत्रही सापडली होती. घटनेनंतर आरपीएफ, जीआरपीएफची, बॉम्बशोधक पथके घटनास्थळी दाखल झाली. बुधवारी सकाळी 9.30 च्या सुमारास शालिमार एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस कारशेडमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर सफाईदरम्यान कर्मचाऱ्यांना काही संशयास्पद वस्तू एका डब्यात आढळल्या.
त्यानंतर सुरक्षा यंत्रणेने तातडीने घटनास्थळी दाखल होत तपासणी केली. त्यांना याठिकाणी पाच जिलेटीनच्या कांड्या, फटाके आणि बॅटरीज् असं संशयास्पद सामान आढळलं होतं.
भाजप सरकारविरोधी पत्र
शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकांसोबत एक पत्रही आढळलं होतं. पत्रातील मजकुरानुसार, चार जणांचा यामध्ये समावेश आहे. "भाजप सरकारला आपल्याला दाखवायचं आहे की आपण काय आहोत आणि आपण काय करु शकतो. आमचा पंजा पडल्यावर काय होतं हे आपल्याला दाखवायचं आहे", अशा आशयाचं हे पत्र होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
बातम्या
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)