एक्स्प्लोर

मॅट्रिमोनियल साईटवर 30 मुलींची फसवणूक करणारा भामटा अटकेत

सचिन पाटील याने तो रसायन शास्त्रामध्ये एम.एससी. आणि मार्केटिंग एमबीए, जपानी कंपनीत सेल्स मॅनेजरचे पद, पगार पाऊण लाख असल्याची माहिती लग्न जुळवणाऱ्या साईटवर टाकली होती.

नवी मुंबई : लग्न जुळवणाऱ्या (मॅट्रिमोनियल साईट) साईट्सवरुन 30 हून अधिक सुशिक्षित, नोकरदार तरुणींना जाळ्यात ओढून त्या तरुणींचं शारीरिक, आर्थिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या आरोपीला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपी स्वतः उच्च शिक्षित असून त्याची दोन लग्न देखील झाली आहेत.

सचिन पाटील ऊर्फ सचिन सांबरे असं या भामट्याचं नाव असून तो पालघर भागात विक्रमगड दहरेंजा या गावातील रहिवाशी आहे. लग्न जुळवणाऱ्या साईट्सवरुन 30 हून अधिक उच्चशिक्षित तरुणींना लग्नाचे अमिष दाखवून तसेच त्यांच्यासोबत प्रेमाचे नाटक करुन त्यांचे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सचिन पाटील ऊर्फ सचिन सांबरेला रबाळे पोलिसांनी बलात्कारासह, फसवणुकीच्या गुह्याखाली अटक केली आहे. सचिनने फसवलेल्या 16 तरुणींनी अतापर्यंत पोलीस ठाण्यात धाव घेतली असली तरी त्याच्या हातून फसल्या गेलेल्या तरुणींची संख्या मोठी असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

आरोपी सचिन पाटील उर्फ सचिन सांबरे हा विवाहित असतानाही त्याने स्वत:ला कधी अविवाहित, तर कधी घटस्फोटित, तर कधी घटस्फोट घेण्याच्या मार्गावर असल्याची माहिती मॅट्रिमोनियल साईटवर दिली. असं करुन तो लग्नास इच्छुक असलेल्या सुशिक्षित, नोकरदार तरुणींना जाळ्यात ओढत होता. दिसायला देखणा असल्याचा फायदा उचलत सचिन पाटील याने तो रसायन शास्त्रामध्ये एम.एससी. आणि मार्केटिंग एमबीए, जपानी कंपनीत सेल्स मॅनेजरचे पद, पगार पाऊण लाख असल्याची माहिती लग्न जुळवणाऱ्या साईटवर टाकली होती. तसेच कधी अविवाहित तर कधी घटस्फोटित असल्याचे तो भासवीत असल्याने त्याच्या मोहजाळात लग्नाळू मुली सहज अडकत होत्या. त्यामुळे त्याने लग्नास इच्छुक असलेल्या तरुणींच्या विश्वासाचा, त्यांच्या भोळेपणाचा आणि वैयक्तिक वा घरगुती समस्यांचा गैरफायदा घेऊन त्यांचे शारीरीक, मानसिक व आर्थिक शोषण केले असल्याचे रबाले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर यांनी सांगितले.

अशाच पद्धतीने त्याने वर्षभरापूर्वी नवी मुंबईत राहणाऱ्या एका वकील तरुणीला मॅट्रिमोनियल साईटवरुन आपल्या जाळ्यात ओढले होते. तिला आपली फसवणूक झाल्याचे कळले तेव्हा या तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे रबाळे पोलिसांनी सचिनने फसवलेल्या तरुणींना तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
Embed widget