एक्स्प्लोर
तातडीच्या उपचारावेळी रुग्णाकडून चेक स्वीकारा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई : सर्व खासगी रुग्णालयांनी तातडीच्या उपचाराप्रंसगी रुग्णांकडून चेक स्वीकारण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबत काटेकोर अमंलबजावणी व्हावी, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून लक्ष ठेवले जाणार आहे.
रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून सहकार्य न मिळाल्यास त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी 108 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे.Maharashtra Govt issues strict instructions to all private hospitals of State to accept cheques from patients in case of emergency treatment
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 13, 2016
And if any person comes across any kind of difficulty or non-cooperation from any hospital, he can dial our helpline number 108 for help. — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) November 13, 2016रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी संबधीत रूग्णालयातील जबाबदार व्यक्तीचा दूरध्वनी किंवा मोबाईल क्रंमाक घ्यावा. जेणेकरून त्यांना चेक स्वीकारण्याबाबत मदत होईल. त्याचबरोबर एखादया रूग्णाने उपचार घेतलेल्या रूग्णालयास दहा हजार रुपयांपर्यंतचा दिलेला चेक न वटल्यास या चेकची प्रतिपूर्ती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्याचा निर्णयही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement