एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2020 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2020 | मंगळवार
- मराठा आरक्षणाच्या वैधतेवर लवकरच नियमित सुनावणी, पुढील बुधवारी अंतरिम आदेशासाठी युक्तिवाद, न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती नाही, ही आनंदाची बाब असल्याचं आरक्षण कार्यकर्ते विनोद पाटील यांची भावना https://bit.ly/2WaTk6j
- सप्टेंबरपूर्वी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विद्यापीठांना निर्देश https://bit.ly/38ATB7o केंद्राला विद्यार्थ्यांच्या जीवाची पर्वा नसल्याचा शिवसेनेचा आरोप तर अनेक विद्यार्थी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात https://bit.ly/2ZPeK9M
- राज्यात लवकरच 10 हजार जागांसाठी पोलीस भरती, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा, भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश https://bit.ly/3e8weDo
- पारनेरमधील शिवसेना नगरसेवकांना अजित पवारांनी फोडलं असं म्हणता येणार नाही, संजय राऊत यांच्याकडून सारवासारव,अशा किरकोळ फोडाफोडीमुळे महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होणार नसल्याचा विश्वास https://bit.ly/2ACMJKf
- कोरोनाच्या काळात रस्त्यांवरील फेरीवाले सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं सर्वात धोकादायक, राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांची हायकोर्टात माहिती, फेरीवाल्यांना रस्त्यावर व्यवसाय करण्यासाठी परवानगी मिळण्याची शक्यता धूसर https://bit.ly/2ZIfWfj
- बजाज ऑटोच्या औरंगाबादमधील प्लांटमध्ये 403 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, कामगार युनियनचा दावा; कंपनी व्यवस्थापनाने युनियनचा आरोप फेटाळला, काम थांबवणार नसल्याचं स्पष्टीकरण https://bit.ly/3e8Bnes
- कोरोनावरील लस येण्यासाठी अजून किमान सहा महिन्यांची प्रतीक्षा, ऑक्सफर्डसाठी लस निर्मिती करणाऱ्या अदर पूनावाला यांची माहिती, पुण्यात मायलॅबसोबत कोरोना चाचण्यांसाठी आवश्यक RT PCR चाचण्यांच्या मशिनचं लाँचिंग https://bit.ly/3gLXlWH
- मुंबईसह राज्यात आजही अनेक ठिकाणी संततधार, तळकोकणात मुसळधार, निर्मला नदीला पूर, कुडाळचा तालुक्यातील 27 गावांशी संपर्क तुटला https://bit.ly/3gxpFMb
- गडचिरोलीत गरोदर मातेची प्रसूतीसाठी तब्बल 23 किलोमीटरची पायपीट, पाऊस सुरू असताना नदी नाल्यातून प्रवास, प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पात झाली प्रसूती https://bit.ly/2BLrqqm
- शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवावर कोरोना लॉकडाऊनचं सावट, साईंबाबांच्या झोळीत उत्सव काळात अवघं 79 लाख रुपयाचं दान, मागील वर्षाच्या तुलनेत साडेतीन कोटींची घट https://bit.ly/2BMUyxh
दिन विशेष : प्रिय माही भाई..... केदार जाधवचं महेंद्रसिंह धोनीला वाढदिवसानिमित्त खास पत्र https://bit.ly/2ChO5KD
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement