एक्स्प्लोर
Advertisement
ABP Majha Impact | अन् चिमुकला आईला बिलगला... लॉकडाऊनमध्ये ताटातूट झालेल्या मायलेकराची अखेर भेट
अचानक लॉकडाऊन घोषित केल्यामुळे आई-वडील मुंबईत तर मुलगा विरारला आजी आजोबांकडे अडकून पडले होते. या ताटातूट झालेल्या मायबाप आणि लेकराची एबीपी माझाच्या बातमीमुळे भेट झाली आहे.
मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक जण अडकून पडले आहेत. काळात अनेक जण आपल्या प्रियजनांपासून दूर आहेत. मुंबईत देखील एका आईवडील अन् मुलाची ताटातूट झाली होती. अचानक लॉकडाऊन घोषित केल्यामुळे आई-वडील मुंबईत तर मुलगा विरारला आजी आजोबांकडे अडकून पडले होते. या ताटातूट झालेल्या मायबाप आणि लेकराची एबीपी माझाच्या बातमीमुळे भेट झाली आहे. या संदर्भात एबीपी माझाच्या वेबसाईटवर Mumbai Lockdown | पोर हिरमुसलं... मुंबईत लॉकडाऊनमुळे आईवडील अन् मुलाची ताटातूट या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आलं होतं. या बातमीची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली. त्यांनंतर पोलिसांकडून परवानगी मिळाल्यानंतर अखेर आई आणि मुलाची भेट झाली.
ABP MAJHA IMPACT | शेवटी 'त्या' चिमुकल्याला आईकडे पोहोचवलं, लॉकडाऊनमध्ये ताटातूट झालेल्या मायलेकराची एबीपी माझाच्या बातमीमुळे भेट pic.twitter.com/3bxwEpnHIZ
— ABP माझा (@abpmajhatv) April 19, 2020
त्याचं झालं असं की सात वर्षाचा आरिव आयरे आपली दुसऱ्या इयत्तेतील परीक्षा 10 मार्चला झाल्यानंतर सुट्ट्या मिळाल्याच्या आनंदात होता. आरिवची आई वैशाली आणि वडील अशोक दोघेही नोकरीला जातात. आरिवला घरी एकटं सोडणे शक्य नव्हते म्हणून थोड्या दिवसासाठी त्यांनी मुलाला आजी आजोबांकडे विरारला पाठवले होते. तेव्हा कुणाला वाटलंच नव्हतं की कोरोनाचे संकट इतकं मोठं होईल. लॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल.कोणीच प्रवास करू शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आणि आरिव आजी आजोबांकडे आणि आई वडील पार्ल्यात अशी परिस्थिती निर्माण झाली.
सुरुवातीला आरिवला आजीआजोबा, आईवडिलांनी सगळी परिस्थिती समजवून सांगितली. 14 एप्रिलपर्यंतच वेळ काढायचा आहे. मग सगळं ठीक होईल असं सांगितल्यामुळे तो चिमुरडाही तयार झाला. सुरुवातीला आरिव रमला मग नंतर कॅलेंडरवर दिवस मोजत दररोज आई वडिलांशी व्हिडीओ कॉल मधून बोलत 14 तारखेची वाट पाहत होता. नंतर देशात लॉकडाऊन पुन्हा 3 मे पर्यंत वाढवला गेला. हे कळल्यावर चिमुकला आरिव हिरमुसला. इतके दिवस कधीच तो आईपासून लांब राहिला नव्हता. आरिवनं 'मी चालत येतो आई, तू माझी काळजी नको करू' असं आपल्या आईला म्हटलं होतं.
आईवडील आणि चिमुरड्याच्या ताटातूटीसंदर्भात काल एबीपी माझा डिजिटलवर वृत्त प्रकाशित करण्यात आलं. या बातमीची सुप्रिया सुळे यांनी दखल घेतली. आणि आई वडिलांना मुलाला भेटून घेऊन जाण्यासाठी पोलिसांकडून परवानगी मिळाली. अन् अखेर आई आणि मुलाची भेट झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement