Aarey Metro Car Shed : आरे बचावासाठी उद्या पर्यावरणवाद्यांचं आंदोलन, कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला
Aarey Metro Car Shed : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्या सकाळी 11 वाजता आरे परिसरात पर्यावरणवादी एकत्र येणार आहेत.
Aarey Metro Car Shed : राज्यात सत्तांतर होताच मुंबईतल्या मेट्रोची कारशेड पुन्हा आरेमध्ये (Aarey Metro Car Shed ) करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतलाय. नव्या सरकारच्या या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांनी उद्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे मेट्रो कारशेड परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्या सकाळी 11 वाजता आरे परिसरात पर्यावरणवादी एकत्र येणार आहेत. कारशेड पुन्हा आरेमध्ये आणल्यास आम्ही पुन्हा येऊचे पोस्टर्स व्हायरल करण्यात आलेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
शिंदे सरकारनं आल्या आल्या 'आरे'मध्येच मेट्रो कार शेड होणार असल्याचं राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांना कळवलं आहे. आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला होता. यावरुन मोठा गदारोळ देखील झाला होता. आरेमधील मेट्रो शेड विरोधात नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता.
2019 साली एका रात्रीत 'आरे'मध्ये मेट्रो कारशेडच्या बांधणीसाठी 2700 झाडांची कत्तल करण्यात आली आहे. झाडांची कत्तल करण्यास रात्रीच्या काळोखाचा आधार घेण्यात आला होता. सामान्य जनतेला आणि पर्यावरणप्रेमींना ही बाब लक्षात येताच त्यांनी 'आरे'कडे धाव घेतली आणि मोठं जनआंदोलन झाले होते. त्यामुळे आता पुन्हा आरे वाचवण्यासाठी मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
Aarey Metro Car Shed : 'आरे'तच मेट्रो कारशेड होणार? सध्या काय आहे कारशेडची स्थिती...