एक्स्प्लोर

Aaditya Thackeray : ठाकरे- मोहित कंबोज वैर संपलं का? भाजपसोबत ठाकरेंची जवळीकता वाढतेय का? 

Mohit Kamboj Party : शिवसेना फुटीनंतर ठाकरेंची सेना आणि भाजपचे मोहित कंबोज यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप झाले होते. आताच्या ताज्या घडामोडींमुळे तो राजकीय संघर्ष संपला का असा प्रश्न विचारला जात आहे. 

मुंबई : सध्या राजकीय चर्चा रंगली ती म्हणजे मोहित कंबोज (Mohit Kamboj) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या भेटीची. शनिवारी मोहित कंबोज यांनी आपल्या लेकीच्या वाढदिवसानिमित्त पार्टीचा आयोजन केलं होतं. वाढदिवसानिमित्त मोहित कंबोज यांनी अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजकांना निमंत्रित केलं होतं. मात्र निमंत्रितांमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव असल्याने आणि आदित्य ठाकरे हे वाढदिवसानिमित्त मोहित कंबोज यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

ज्या मोहित कंबोज यांनी महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक आरोप केले होते, मोहित कंबोज विरुद्ध ठाकरे शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला होता त्या संघर्षाला पूर्णविराम लागला का? राजकीय वैर यानिमित्ताने संपलं का? असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.

Aaditya Thackeray At Mohit Kamboj Party : आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीची चर्चा

खरंतर एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप आणि मातोश्री बाहेर झालेला राडा याला काही वर्ष उलटून गेलेत. मात्र अजूनही कार्यकर्ते मोहित कंबोज विरुद्ध ठाकरे शिवसेनेचा संघर्ष विसरलेले नाहीत. त्यात आता आदित्य ठाकरे यांनी मोहित कंबोज  यांच्या लेकीच्या वाढदिवसाला  लावलेली उपस्थिती चर्चेचा चांगलाच विषय बनली आहे. कारण मोहित कंबोज आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. शिवसेना पक्ष कोटीच्या वेळी सुद्धा मोहित कंबोज शिंदे यांच्या शिवसेनेसोबत पाहायला मिळाले होते. आता या सगळ्या राजकीय वैरा नंतर हे सगळं विसरून आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या या लेकीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले.

Mohit Kamboj Party : बडे नेते, सेलिब्रेटी हजर 

मोहित कंबोज यांच्या लेकीच्या वाढदिवसाला फक्त आदित्य ठाकरेच नाही तर ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर सुद्धा उपस्थित होते. त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री आशिष शेलार, अमित साटम, सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे हे राजकारणी त्यासोबतच रितेश देशमुख, संजय दत्त शाहरुख खान यांसारखे सेलिब्रिटी, त्यासोबतच अनंत अंबानी सुद्धा या वाढदिवसाला उपस्थित होते. मात्र या सगळ्या उपस्थित यामध्ये चर्चा झाली ती फक्त आदित्य ठाकरे यांची. 

Aaditya Thackeray Vs Mohit Kamboj : ठाकरे-कंबोज वैर संपलं का? 

आदित्य ठाकरे यांच्या या वाढदिवसाच्या उपस्थितीने अनेक अर्थ काढले जात आहेत. त्यावर सोशल मीडियावर सुद्धा त्यांना ट्रोलर्सला सामोरे जावे लागतंय. एकतर जे राजकीय वैर मागील काही दिवसांपासून कंबोज आणि ठाकरेंच्या नेत्यांमध्ये पाहायला मिळालं होतं ते राजकीय वैर संपलंय का? या राजकीय संघर्षाला पूर्णविराम लागलाय का? की मग शिंदे शिवसेना आणि भाजपच्या नाराजीच्या चर्चा असताना भाजप नेत्यांसोबत अधिक जवळीक ठाकरेंच्या शिवसेनेकडून साधली जातीये का? अशी सुद्धा चर्चा आहे.

त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून ही राजकीय भेट नव्हती वैयक्तिक भेट होती आणि त्यात राजकारण आणू नये असं तरी म्हटलं जात आहे. असं असलं तरी या भेटीनंतर किंवा या कार्यक्रमाला आदित्य ठाकरे यांनी लावलेली उपस्थिती, यानंतर मोहित कंबोज यांच्यासोबत राजकीय वैर संपलं की भाजपसोबतची ठाकरे यांच्या शिवसेनेची जवळीक वाढतेय? असे प्रश्न विचारले जात आहेत. हे सगळं घडत असताना राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा कायमचा मित्र, याची प्रचिती मात्र येत आहे. 

ही बातमी वाचा:

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget