मोठी बातमी : इकडे SIT मार्फत चौकशीच्या घोषणेची शक्यता, तिकडे आदित्य ठाकरे दुबईत!
राज्य सरकार (Maharashtra Government) आदित्य ठाकरेंची दिशा सालियन प्रकरणी एसआयटीची (SIT) चौकशी करणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आलेल्या या बातमीनंतर राजकारण चांगलेच तापले
मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या अडचणी येत्या काळात वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियान (Disha Salian) आत्महत्या प्रकरणाचा तपास पुढे सरकत आहे. राज्य सरकार (Maharashtra Government) आदित्य ठाकरेंची या प्रकरणी एसआयटीची (SIT) चौकशी करणार आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आलेल्या या बातमीनंतर राजकारण चांगलेच तापले. मात्र या मोठ्या बातमीनंतर आदित्य ठाकरे नेमकं कुठे अशी चर्चा सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात नसून सध्या दुबईत आहे.
जवळपास तीन वर्षांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. त्याच्या काही दिवस आधीच दिशा सालियानचा देखील मृतयू झाला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी सातत्याने या दोन्ही प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते. या प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून सुरू आहे. आता एसआयटी चौकशी देखील होण्याची शक्यता आहे. आदित्या ठाकरेंना लवकरच अटक होणार असून अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे परदेशात पळून जाणार असल्याचा दावा नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला होता. त्यानंतर आज एसआयटी चौकशी आणि आदित्य ठाकरे दुबईत यानंतर पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
आदित्य ठाकरे दुबईत
मात्र आदित्य ठाकरे हे दुबईत एका परिषदेसाठी गेले आहेत. संयुक्त राष्ट्रांची वार्षिक जागतिक हवामान परिषद (COP28) दुबईत सुरू असून या परिषदेसाठी आदित्य ठाकरे दुबईला गेले आहेत. बुधवारी आदित्य ठाकरे या परिषदेस उपस्थित होते. विविध चर्चा सत्रांदरम्यान महाराष्ट्राचा माजी पर्यावरण मंत्री आणि लोकप्रतिनिधी या नात्याने आदित्य ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. तसेच ह्यावेळी ROOH च्या अभ्यासपूर्ण सत्रामध्ये देखील ते सहभागी झाले. सत्रामध्ये गरजूंना पर्यावरणपूरक घरे कशी देता येतील, ह्याबाबत चर्चा करण्यात आली.
I am at #COP28 to gain perspective on latest developments in the climate sphere. I will also have the honour to speak at multiple events sharing my insights and policy work in Maharashtra as a former minister for environment and climate change, and a legislator. pic.twitter.com/2EPGetBLRP
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 6, 2023
आदित्य ठाकरे लवकरच जेलमध्ये जाणार, नारायण राणेंचा दावा
केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) ठाकरे कुटुंबीयांवर पुन्हा एकदा सडकून टीका केली आहे. सुशांत सिंह आणि दिशा सालियन केसमध्ये (Disha Salian case) आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) लवकरच जेलमध्ये जातील असा दावा नारायण राणेंनी केला आहे. तसेच त्यांच्यासोबत संजय राऊतही जेलमध्ये जातील असंही ते म्हणाले.
हे ही वाचा :
Aaditya Thackeray SIT news Live: दिशा सालिअन प्रकरणात सगळं सुडाचं राजकारण, चौकशीत काहीच मिळणार नाही : सुनिल प्रभू