Aaditya Thackeray : मागील रांगेत बसण्याबाबत प्रश्न, आदित्य ठाकरेंचं उत्तर, काही जणांचा उल्लेख करत म्हणाले...
Aaditya Thackeray : नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळीच्या कोळीवाड्यात दाखल झाले होते.यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

मुंबई: नारळी पौर्णिमेनिमित्त कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी वरळीचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) कोळीवाड्यात दाखल झाले होते. याचवेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) कोळीवाड्यातून बाहेर पडत होते. दोन्ही नेते आमने सामने आल्यानं दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या सर्व प्रकारानंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्याकडे तुम्ही पाहात होता, असा प्रश्न विचारला असता आदित्य ठाकरे यांनी काय गडबड झाली हे पाहत होतो, काही नाही, असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांना कोळीवाड्या पाहून काय वाटलं असं विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी काही लोकांना महत्त्व द्यायचं नसतं तसं आम्ही देत नाही, असं म्हटलं.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की , महत्त्वाची गोष्ट ही आहे, राहुल गांधी यांनी काल निवडणूक आयोगाला एक्सपोझ केलं आहे, त्यामुळं ही मंडळी कशी सरकारमध्ये आणि डोक्यावर बसली हे जगभरात कळलेलं आहे. अनेक फेकनाथ लोकांना मिळतील हे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
मागील रांगेत बसण्यासंदर्भात आदित्य ठाकरे काय म्हणाले?
राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांसमोर मतचोरी संदर्भातील प्रेझेंटेशन केलं. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत हे मागील रांगेत बसल्याबद्दल भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने टीका केली होती. त्याबाबत आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी काही जण त्यांच्यात असतात धक्काबुक्की करुन पुढे बसायचं, काल पारंपरिक असं घरगुती वातावरण होतं, दुसरं म्हणजे थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की शेवटच्या रांगेत बसता, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. स्क्रीनच्या समोर जवळ किती बसायचं आणि घरगुती वातावरण असताना आम्ही कुठं बसायचं हा आमचा निर्णय आहे. त्यांना आम्ही कुठं बसलोय हे झोंबलं नाही, निवडणूक आयोग त्यांच्या कार्यालयातून चालतो हे राहुल गांधींनी एक्सपोझ केलं हे झोंबलं आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
कोळी बांधवांच्या प्रश्नांसाठी सोनोवाल साहेबांना भेटल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंच्या बैठकीत काय घडलं ते सांगता येणार नाही. मात्र, चांगली चर्चा झाली, असं त्यांनी म्हटलं.
ते मिंधे गटाली लोक चोर गट आहे, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, मध्ये एक ठाकरे पण घेतले, त्यांना आमच्या बद्दल फॅसिनेशन आहे, उद्या ते आमचा मास्क घालून फिरायला लागले तर आश्चर्य वाटू देऊ नका. स्वत:;चं कर्तव्य काही नाही. ओळख आणि तिकीट उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते आता भाजपचे गुलाम म्हणून जगत आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे.


















