एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी
सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचं अध्यक्षपद पुन्हा शिवसेनेकडेच आले आहे. शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. आदेश बांदेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे.
मुंबई : सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचं अध्यक्षपद पुन्हा शिवसेनेकडेच आले आहे. शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. आदेश बांदेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी आहे.
अभिनय क्षेत्रातून आपल्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात केलेल्या आदेश बांदेकरांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेतही त्यांना वेळोवेळी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यास देण्यात आल्या.
दादरमधून मनसेचे नितीन सरदेसाई यांच्याविरोधात आदेश बांदेकरांनी शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यात ते पराभूत झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडे शिवसेनेच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
आता अत्यंत प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड निश्चित झाल्याने आदेश बांदेकरांकडे मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
दरम्यान, महामंडळाच्या विस्ताराचा शुभारंभही सरकारने सिद्धिविनायक मंदिरापासून सुरु केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement