एक्स्प्लोर

पतीला संपवणाऱ्या पत्नीला प्रियकरासह अटक

हत्या झाल्यापासून फरार असलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराला उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून शांतीनगर पोलिसांनी सापळा लावून गजाआड केलं.

भिवंडी : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला संपवणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. पत्नी गुलशबा हिने 22 वर्षीय प्रियकराच्या साथीने राहत्या घरात अत्यंत निर्दयीपणे मुंडके धडावेगळं करून खून केल्याची धक्कादायक घटना 7 जानेवारी रोजी भिवंडीतील नागाव परिसरात उघडकीस आली होती. हत्या झाल्यापासून फरार असलेल्या पत्नीसह तिच्या प्रियकराला उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातून शांतीनगर पोलिसांनी सापळा लावून गजाआड केलं. पत्नी गुलशबा (24) तिचा प्रियकर रिजवान मोहम्मद कुरेशी (22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. तर कैफ उर्फ मनोजकुमार उर्फ राहूल जगदीशप्रसाद सोनी (30) असं हत्या करण्यात आलेल्या पतीचं नाव आहे. मृत कैफ उर्फ मनोजकुमार सोनी याचा प्रेमविवाह गुलशबा हिच्याशी 7 वर्षांपूर्वी झाला होता. त्याने प्रेमिका गुलशबा हिच्याशी लग्न करण्यासाठी धर्मांतर केलं होतं. मृत मनोजकुमार हा गुलशबा आणि 3 मुलांसोबत नागाव परिसरातील विठ्ठल निवास इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होता. तो आग्रा येथे कटलरी सामान विक्रीचे काम करीत असल्याने दीड ते 2 महिन्यांनी घरी येत असे. 3 जानेवारी रोजी तो घरी आला असता त्याने पत्नीला रिजवानसोबत अश्लील चाळे करताना पाहिलं. त्यावरून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. आपल्या अनैतिक संबंधात आता पती अडथळा ठरत आहे, असे वाटू लागल्याने पत्नी गुलशबा आणि प्रियकर रिजवान या दोघांनी संगनमत करून मनोजकुमार याचा धारदार शस्त्राने डोके धडावेगळे करून मृतदेह घरातच टाकून फरार झाले. प्रेयसीसोबत फरार झालेल्या रिजवानने नातेवाईक शाबादला संपर्क करून घटनेची माहिती देऊन यातून मार्ग काढण्यास सांगितलं. मात्र शाबाद कुरेशी याने या घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ शांतीनगर पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता घरात कैफ उर्फ मनोजकुमार यांचं शीर धडावेगळं केलेल्या अवस्थेत आणि त्यावर चादर ब्लँकेट ठेवलेलं होतं. तो मृतदेह अत्यंत सडलेला होता. चार दिवसांपूर्वी त्याचा खुन करण्यात आला असल्याचं पोलिसांना तपासात आढळून आलं. याप्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी गुलशबा हिच्यावर संशय व्यक्त केला होता. दरम्यान, हत्येच्या दिवशीच आरोपी पत्नी तिन्ही मुलांना आजीकडे सोडून प्रियकरासोबत उत्तर प्रदेशात पळून गेली होती. त्यानुसार शांतीनगर पोलिसांच्या दोन पथकांनी उत्तर प्रदेशमधील रामपूर जिल्ह्यातील एका गावातून पत्नी गुलशबा  आणि रिजवान यांना सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं. दोघांनाही भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक पोलीस कोठडी सुनावली असून शांतीनगर पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
Embed widget