एक्स्प्लोर
वाशी खाडीजवळ उलटलेली क्रेन हटवण्याचं काम अद्याप सुरुच
रविवारी महामार्गावरील पादचारी पूल हटवताना क्रेन उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली. दुपारी चारच्या सुमारास ही क्रेन पलटी झाली.
नवी मुंबई: सायन-पनवेल महामार्गावरील पादचारी पूल बाजूला काढण्यात यश आलं आहे. पण उलटलेली क्रेन बाजूला करण्याचं काम अद्याप सुरु आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक संथ गतीने सुरु आहे. परिणामी सायन - पनवेल महामार्गावर वाहतुकीची कोंडी कायम आहे. वाशीकडे जाणारी वाहतूक सध्या तुर्भेमार्गे वळण्यात आली आहे. जुईनगरचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.
रविवारी महामार्गावरील पादचारी पूल हटवताना क्रेन उलटल्यानं मोठी वाहतूक कोंडी झाली. दुपारी चारच्या सुमारास ही क्रेन पलटी झाली.
वाशी खाडीजवळ असलेल्या जकात नाक्यासमोर अर्धवट अवस्थेत पडलेला पादचारी पूल हटविण्याचे काम काल सकाळपासून सुरु होतं. चार वाजताच्या दरम्यान या मार्गावरील वाहतूक बंद करून क्रेनच्या साहाय्याने हा पादचारी पूल हटवण्यास सुरुवात झाली, तेव्हा पुलाचं वजन जास्त झाल्यामुळे क्रेन पुलासह रस्त्यावर उलटली.
त्यानंतर गेल्या अनेक तासांपासून मुंबईकडे येणारी आणि वाशीकडे जाणारी वाहतूक कासव गतीनं सुरु आहे. सोयीसाठी ही वाहतूक सध्या ऐरोली मार्गे वळवण्यात आली आहे. मात्र वाहतूक पूर्ववत व्हायला आणि क्रेन हटवायला आणखी काही तास लागणार आहेत.
दुपारच्या सुमारास या मार्गावरील वाहतूक बंद करून क्रेनच्या सहाय्यानं पूल हटवण्यास सुरूवात झाली. मात्र पुलाचं वजन जास्त झाल्यानं क्रेन पुलासह रस्त्यावर उलटली. सुदैवानं वाहतूक बंद केली असल्यानं यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही.
PHOTO: सायन-पनवेल हायवेवर प्रवास करणाऱ्यांचा वीकेंड ट्रॅफिकमध्ये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement