Jumbo Mega Block : मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक ; 350 लोकल गाड्या होणार रद्द
Jumbo Mega Block : मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक 05 , 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी असेल.
Jumbo Mega Block : मध्य रेल्वेवर 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या (Central Railway) ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक 05 , 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी असेल. या मेगा ब्लॉक दरम्यान, शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 350 लोकल ट्रेन देखील या दिवशी धावणार नाहीत.
ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 5 व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि 6 व्या लाईनवर हा जम्बो मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस बंद राहणार आहेत.
कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या या मेगा ब्लॉकमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत.
दिवा-वसई मेमु ट्रेन रद्द करण्यात आल्या असून अनेक गाड्या पनवेल स्थानकात थांबवण्यात येणार आहेत. तर सर्व फास्ट (जलगद लोकल) लोकल गाड्या स्लो (धिम्या मार्गावर) ट्रॅकवर डायव्हर्ट केल्या जाणार आहेत.
मध्य रेल्वेवरील पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांसाठी आतापर्यंत अनेक मोठे जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. मात्र अजूनही दोन मेगाब्लॉक शिल्लक असल्याचं मध्य रेल्वेने सांगितलं होतं. यापैकी पहिला मेगा ब्लॉक येत्या 22 आणि 23 जानेवारीला घेण्यात आला. तर 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारा दुसरा मेगाब्लॉक हा 72 तासांचा आहे. या दोन मेगाब्लॉकनंतर पाचवी आणि सहावी मार्गिका कार्यन्वित होईल, असंही एमआरव्हीसीनं सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवी मुंबई पालिका प्रभाग रचनेत घोळ, वाॅर्ड नियमबाह्य तोडल्याने भाजपा न्यायालयात जाणार, मनपा अधिकार्यांवर कारवाईची मागणी
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद कायम, प्रकल्पग्रस्त पुन्हा करणार एल्गार, काम देखील बंद पाडणार
- नवी मुंबई पालिकेचा अभिनव उपक्रम, आता बसमध्येही ग्रंथालयाची सुविधा
- पायाभूत सुविधा आणि घरांच्या उभारणीसाठी अर्थसंकल्प सकारात्मक, घरे स्वस्त होण्याचा जाणकारांचा अंदाज