एक्स्प्लोर
विवाहबाह्य संबंधांचा संशय, वृद्धेकडून 75 वर्षीय पतीची हत्या
दोन शेजारी महिलांसोबत छोटेलाल मौर्य यांचे संबंध असल्याच्या संशयातून आपण पतीची हत्या केली, अशी कबुली पत्नी धानूदेवींनी दिली.
मुंबई : 65 वर्षीय वृद्धेने आपल्या 75 वर्षीय पतीची हत्या केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. दोन महिलांशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून महिलेने पतीचा जीव घेतला. आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.
जेवणानंतर आपण टेलरकडे गेलो होतो. 40 मिनिटांनी घरी परत आल्यावर पती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले, असा बनाव सुरुवातीला धानूदेवी यांनी केला होता. छोटेलाल यांचा मृत्यू रविवारी झाला होता.
छोटेलाल यांच्या डोक्यावर धारदार वस्तूने प्रहार करुन त्यांची हत्या झाल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली. बाहेरील व्यक्तीने घरात प्रवेश केला नसल्याचं तपासात समोर आल्यामुळे धानूदेवींवर पोलिसांचा संशय बळावला.
मालमत्तेच्या वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी बांधला होता. मात्र छोटेलाल यांचं कोणाशीही वैर नसल्याचं त्यांच्या मुलांनी सांगितलं. पत्नीसोबत छोटेलाल यांचे वारंवार खटके उडत असल्याचं पोलिस तपासात समोर आलं.
अखेर, दोन शेजारी महिलांसोबत छोटेलाल यांचे संबंध असल्याच्या संशयातून आपण पतीची हत्या केली, अशी कबुली धानूदेवींनी दिली. जेवणानंतर छोटेलाल झोपलेले असताना धानूदेवींनी त्यांच्या डोक्यावर पेव्हर ब्लॉकने वार केला. पतीची शुद्ध हरपल्याचं लक्षात येताच धानूदेवींनी पळ काढला.
मौर्य दाम्पत्याच्या मालकीची चार दुकानं असून ते त्याच्या वर असलेल्या खोलीत राहत होते. घराजवळ एका हातगाडीवर ते कांदे-बटाटे विकायचे.
छोटेलाल मौर्य हे चेंबुरमधील क्रिष्णा मेनन चाळीत पत्नी धानूदेवीसोबत राहत होते. मौर्य दाम्पत्याला चार मुलं आणि दोन मुली आहेत. त्यापैकी एक मुलगा दुबईत, तर उर्वरित मुलं मुंबई-ठाण्यात राहतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement