एक्स्प्लोर
कोलकाताच्या 'ड्रीमगर्ल'चा वृद्धाला 73 लाखांचा गंडा, तीन आरोपी अटकेत
खारघर येथे राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्धाला तब्बल 73 लाखांचा चुना कलकत्तामधील ड्रिम गर्लने लावला आहे. अखेर या ड्रीम गर्लकडून पिछा सोडवण्यासाठी पीडत वृद्धाने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
नवी मुंबई : दोन महिन्यांपूर्वी आलेला आयुष्मान खुरानाच्या ड्रिम गर्ल चित्रपटातील पुजा लोकांना फोन करून एन्टरटेन करत होती. फोनवर प्रेमाच्या गप्पा मारत पुरूषांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे पाहायला मिळतं. पण पद्यावरची ही गोष्ट प्रत्यक्षातही घडली आहे. अशाच पद्धतीने खारघर येथे राहणाऱ्या एका 65 वर्षीय वृद्धाला तब्बल 73 लाखांचा चुना कलकत्तामधील ड्रिम गर्लने लावला आहे. अखेर या ड्रीम गर्लकडून पिछा सोडवण्यासाठी पीडत वृद्धाने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सदर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी कलकत्ता येथून ती आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एक महिला आणि तृतियपंथीयाचा समावेश आहे.
खारघरमध्ये राहणाऱ्या 65 वर्षीय वृद्धाला सुंदर मुलींचे अमिष दाखवणाऱ्या कॉल सेंटरचा खारघर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या वृद्ध व्यक्तीला कोलकत्तामधून एका मुलीचा फोन येत असे. लोकॅन्टो डेंटींग सर्व्हिस आणि स्पीड डेंटींग झोन या कंपन्यांमधून तरूणी वृद्ध व्यक्तीला फोन करत होती. तसेच आमच्या कल्बची मेंबरशिप घेतली तर या सुंदर मुलींसोबत तुम्हाला डेटवरही जाता येईल, असंही या तरूणीने वृद्ध माणसाला सांगितलं होतं. एवढचं नाहीतर त्यांच्या मोबाईलवर सुंदर मुलींचे फोटोही पाठवण्यात येत होते आणि तुमच्यासोबत फोनवरून अश्लिल संभाषण साधणाऱ्या मुली फोटोंमधीलच असल्याचेही भासवले जात होते. काही दिवसांनी या तरूणीने आपल्या क्लबची मेंबरशिप फी, आयकार्ड फी, मुलींना मुंबईत पाठवण्यासाठी लागणारा खर्च असे पैसे या वृद्ध माणसाकडून ड्रीमगर्लने पैसे उकळले.
पैसे भरूनही आपल्यापर्यंत मुली पोहोचत नसल्याचे लक्षात आल्यानंतर वृद्ध माणसाने संबंधीत डेटींग कंपनीला यापुढे आपण एकही पैसा देणार नसल्याचे सांगितले. मग मात्र पैसे उकळण्यासाठी ड्रिमगर्लने वृद्ध माणसाला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तुमचे संभाषण, फोन डिटेल्स आमच्याकडे आहेत, पैसे दिले नाहीतर हे सर्व घरच्यांकडे पाठवण्यात येतील असंही सांगितलं. त्याच बरोबर हे सर्व कागदपत्र पोलिसांच्या हाताला लागले असल्याचे फसवत क्राइम ब्रांच पोलीस अधिकारी बोलत असल्याचे सांगून 73 लाख रूपये उकळले.
दरम्यान, वृद्ध माणसांच्या घरातल्यांना संशय आला आणि आपल्या वडिलांचे एवढे पैसे नक्की कुठे गेले?, याचा शोध मुलाने घेतला आणि ड्रिमगर्लच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर वद्ध माणसाने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना फोन नंबरवरून माहिती घेत कोलकाताला जावून लोकॅन्टो डेंटींग सर्व्हिस आणि स्पीड डेंटींग झोन कंपनीवर छापा टाकत तीन आरोपींना अटक केली. याच महिला आरोपी माही रवी दास, प्रबीर सहा आणि अर्नब रॉय यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक महिला आणि तृतियपंथीयाचा समावेश आहे. तसेच डेटिंग कॉल सेंटरच्या माध्यमातून अनेक लोकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांना लुटण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे फोन करणाऱ्या ड्रिमगर्लच्या प्रेमात पडू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement