मुंबईत 60 लाखांचा हिरोइन जप्त; गुन्हे शाखेची कारवाई
मुंबई गुन्हे शाखेने शहरात मोठी कारवाई करत 60 लाखांचा हिरोइन जप्त केलं आहे. या कारवाईत एका 60 वर्षांच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबई क्राईम ब्रांच 4 ने मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. 60 लाखांची हीरोइन आणि गांजा गुन्हे प्रकटीकरण शाखा 4 ने जप्त केले असून एकाला या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपीचं नाव मोहम्मद अस्लम शेख (वय 60) असं या आरोपीचं नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. दोन कोटीच्या जवळपास लोकसंख्या असणार्या या शहरात तरुणाई मोठ्या प्रमाणात आहे. या तरुणाईला दिशाभूल करण्याचे काम या गुन्हेगारांकडून केलं जात होतं. मुंबई क्राईम ब्रांच 4 ला त्यांच्याकडून माहिती मिळाली की 1 जून रोजी ट्रोमबे येथे एक व्यक्ती हिरोइन आणि गांजा विक्रीसाठी येणार आहे. क्राईम ब्रँचने सापळा रचला आणि अली मोहम्मद रफी आलम शेख याला अटक केलं. मोहम्मद रफी असलम शेख कडून 60 लाख रुपयांची हिरोइन आणि 2 किलो गांजाही मुंबई क्राईम ब्रांचने जप्त केला. मोहम्मद रफी असलम शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी सुद्धा अमली पदार्थ विकण्याच्या आरोपाखाली मुंबईच्या ट्रोमबे आणि अमली पदार्थ विरोधी कक्ष घाटकोपर या ठिकाणी सुद्धा गुन्हे दाखल आहेत.
कारागृहात फैलावणाऱ्या कोरोना संदर्भातील याचिकेवर हायकोर्टाचा निकाल जाहीर
पोलिसांकडून तपास सुरूअली मोहम्मद शफी आलम शेख वर कलम 8 (क) सह 20, 21 अमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अली मोहम्मद हा सराईत गुन्हेगार असून या आधीसुद्धा त्याच्यावर अमली पदार्थ विकण्या संदर्भातील गुन्हे दाखल आहेत. त्याच्यासोबत अजून कोण लोक यामध्ये सामील आहेत? ते हा माल कुठे विकतात? आणि कोणाकडून अमली पदार्थ घेतात? या सगळ्या बाबींची चौकशी मुंबई क्राईम ब्रँचकडून केली जात आहे. सदरच्या कामगिरीसह पोलीस आयुक्त गुन्हे विनय चौबे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) शहाजी उमप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्र.पो. निरीक्षक निनाद सावंत आणि यांच्या पथकाने ही कारवाई केली.
BMC | कोरोना रुग्णांकडून जास्त बिल आकारल्याने नानावटी रुग्णालयाविरोधात मुंबई पालिकेकडून गुन्हा दाखल