Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी 55 नव्या रुग्णांची नोंद, 349 सक्रिय रुग्ण
Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायाला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायाला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी मुंबईत 55 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर शनिवारी मुंबईत 43 नव्या रुग्णांची भर पडली होती. शुक्रवारी मुंबईत 44 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते.
बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईमध्ये रविवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 35 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 349 इतके सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,38,854 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी हा 15,712 इतका झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.004 टक्के इतका आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 17, 2022
१७ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता#कोरोना_ला_ना #NaToCorona pic.twitter.com/pZnwOo2MJh
राज्यात रविवारी 127 कोरोना रुग्णांची नोंद तर 107 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार होताना दिसत आहे. रविवारी राज्यात 127 रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या 646 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात राज्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात गेल्या 24 तासात 107 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या चोवीस तासात राज्यात एकाही कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,27, 372 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 98, 66, 301 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. राज्यात सध्या 646 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 349 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 42 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.