एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ओला कॅब चालकांना लुटणारी टोळी, कॉलेज तरुणांना बेड्या
ओला कॅब ड्रायव्हर हे या टोळीचं प्रमुख लक्ष्य होतं. ओला कॅब चालकाला एखाद्या ठिकाणी बोलवून त्याला लुटायचे आणि कॅब घेऊन पळून जायचे, असा या टोळीचा धंदा होता.
कल्याण: पॉकेटमनीसाठी लूटमारी करणाऱ्या 4 कॉलेज युवकांना अटक करण्यात आली आहे. कल्याण पोलिसांनी ही कारवाई केली.
महत्त्वाचं म्हणजे लूटमारी करणारी कॉलेज तरुणांची ही 9 जणांची टोळी आहे. यामध्ये मंत्रालयात काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. तो सध्या फरार आहे.
पोलिसांनी 9 पैकी चौघांना अटक केली आहे. उर्वरित पाच जणांचा शोध सुरु आहे. या टोळीतील चोरटी मुलं ही 18 ते 25 या वयोगटातील आहेत.
ओला कॅब ड्रायव्हर हे या टोळीचं प्रमुख लक्ष्य होतं. ओला कॅब चालकाला एखाद्या ठिकाणी बोलवून त्याला लुटायचे आणि कॅब घेऊन पळून जायचे, असा या टोळीचा धंदा होता.
या टोळीने एक तारखेला रात्री तीन ओला ड्रायव्हर्ससह एकूण चार जणांना लुटलं. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार ठिकाणी सापळे रचून, या चोरट्यांना फिल्मी स्टाईल अटक केली.
ओला चालकांकडून आलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कल्याणमध्येच दोन ठिकाणी नाकाबंदी केली. मात्र या पोरांनी एका ठिकाणी पोलिस व्हॅनला धडक देऊन पोबारा केला. थेट पोलिसांनाच आव्हान देणारी ही टोळी जास्त लांब पळू शकले नाहीत. पुढे एके ठिकाणी दोन रिक्षा आडव्या आल्याने त्यांची गाडी अडकली आणि ते पोलिसांच्या हाती सापडले.
ओला ड्रायव्हर्सना लुटलं
या टोळीने बुधवारी रात्री 10 वाजता टाटा पॉवर हाऊसजवळ एका ओला कॅब ड्रायव्हरला लुटलं. त्यानंतर त्यांनी अंबरनाथकडे कूच केली. तिथे त्यांनी ओला ड्रायव्हरला लुटलंच शिवाय त्याची गाडीही पळवून नेली. त्यावेळी ते मुंब्राच्या दिशेने गेले. मुंब्र्यात त्यांनी एका व्यक्तीला लुटलं आणि माजीवड्याच्या दिशेने धूम ठोकली. तिथे त्यांनी पार्क केलेली ओला लुटली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
आयपीएल
Advertisement