एक्स्प्लोर
बीएमसीत नोकरीच्या आमिषाने 36 जणांना 55 लाखांचा गंडा
चौघा आरोपींविरुद्ध ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे : मुंबई महापालिकेचा आस्थापना अधिकारी असल्याचं भासवून 36 जणांना महापालिकेत कामाला लावण्याचं आमिष दाखवणाऱ्या चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. तब्बल 54 लाख 47 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे. या प्रकरणी चौघा आरोपींविरुद्ध ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी दत्तप्रसाद उर्फ तुषार धुरी, राहुल केळकर, प्रकाश गायकवाड, प्रिया गायकवाड यांनी बीएमसीमध्ये आस्थापना अधिकारी असल्याचे भासवलं. ऑक्टोबर 2017 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत ठाणे पूर्वेला राहणारे फिर्यादी श्रीकांत प्रभाकर जोईल यांचा मुलगा आणि इतर 14 परिचितांना महापालिकेत नोकरी देण्याचं आमिष दाखवलं. बनावट सह्या असलेलं बीएमसीचं खोटं नियुक्तीपत्र, मेडिलक लेटर, जॉइनिंग लेटर देऊन त्यांच्याकडून 18 लाख पाच हजारांची रोख रक्कम घेतल्याचा आरोप आहे.
फसवणूक केल्याप्रकरणी ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 36 जणांची फसवणूक करण्यात आली असून एकूण 54 लाख 47 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे पोलिस करत आहेत. चौघा जणांना अटक झाली असून एक आरोपी फरार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement