एक्स्प्लोर
संमतीविना जन्म, मुंबईकर तरुण जन्मदात्यांविरुद्ध कोर्टात जाण्याच्या तयारीत
जर अर्भकाची जन्म घेण्याला संमती नसेल, तर पालकांना त्याला जन्म देण्याचा हक्क नाही, असं सांगत मुंबईत राहणारा 27 वर्षांचा राफेल सॅम्युअल आई-वडिलांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहे.
मुंबई : कधी, कुठे आणि कोणाच्या पोटी जन्म घ्यावा, हे कोणाच्याच हातात नसतं. खरं तर, जन्म दिल्याबद्दल अनेक जण आपल्या आई-वडिलांचे आजन्म ऋण व्यक्त करतात. मात्र मुंबईतील एका तरुणाला याच गोष्टीचा राग आला आहे. आपल्या संमतीविना आपल्याला जन्म दिल्याबद्दल हा तरुण पालकांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहे.
मुंबईत राहणारा 27 वर्षांचा राफेल सॅम्युअल आई-वडिलांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत आहे. राफेल स्वतःला अँटी नॅटलिस्ट (जन्मविरोधी) म्हणवतो. जर अर्भकाची जन्म घेण्याला संमती नसेल, तर पालकांना त्याला जन्म देण्याचा हक्क नाही, असं राफेलचं मत आहे.
आपलं आई-वडिलांसोबतचं नातं उत्तम आहे, असं एकीकडे सांगताना राफेलला 27 वर्षांनी आपल्या जन्मदात्यांना कोर्टात खेचावंसं वाटत आहे. आपली संमती न घेतल्याबद्दल तो दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
'तुम्ही आई-वडिलांचं देणं लागत नाही, हे मला भारतीय मुलांना पटवून द्यायचं आहे' अशी प्रतिक्रिया राफेलने दिली आहे.
VIDEO | जन्मदात्यांविरुद्ध कोर्टात जाण्याच्या तयारीत असलेल्या रफाएल सॅम्युएलशी खास बातचीत | मुंबई | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement