एक्स्प्लोर
भिवंडीत दारुच्या दुकानात तुफान राडा, घटना सीसीटीव्हीत कैद
भिवंडीत देशी दारुच्या दुकानात झालेल्या जोरदार राड्यात मालकासह ५ जण जखमी झाले आहेत.
भिवंडी : भिवंडीत देशी दारुच्या दुकानात झालेल्या जोरदार राड्यात मालकासह ५ जण जखमी झाले आहेत. बालाजी नगरमधल्या अंकिता देशी बारमध्ये ही घटना घडली आहे.
दोन ग्राहकांमधल्या वादानंतर मालकाने दोघांनाही बारच्या बाहेर काढलं. याचाच राग आल्याने आरोपी मोहम्मद हसन आणि त्याचा भाऊ एजाजने त्याच्या दोन साथीदारांसह बारवर हल्ला केला. बारमध्ये घुसून मालक आणि ग्राहकांवर दारुच्या बाटल्या फोडल्या. यावेळी बार मालकाच्या डोक्यात फरशी टाकून त्यालाही गंभीर जखमी करण्यात आलं.
या संपूर्ण घटनेची दृष्य सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement