एक्स्प्लोर

मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदनामीप्रकरणी दोन गुन्हे दाखल!

एम्सच्या अहवालानुसार सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर मुंबई पोलीस अॅक्शनमध्ये आले आहेत.मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर सेलने दोन गुन्हे दाखल केले आहेत.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदनामी केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी ही माहिती दिली आहे.

ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतीमा मलिन करण्यात आली. त्यांच्याविरोधात अश्लाघ्य भाषेचा वापर केला आणि मुंबई पोलीस दलाला बदनाम करण्यात आलं. याप्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत अनेक सोशल मीडिया अकाऊंट आणि बनावट अकाऊंटवर दोन गुन्हे दाखल केले आहे, अशी माहिती रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.

मुंबई पोलीस आणि सरकारच्या बदनामीसाठी 80 हजार फेक अकाऊंट्स उघडली, सायबर सेलचा अहवाल 

सत्य समोर येतंच, सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न : मुंबई पोलीस आयुक्त

एम्सच्या अहवालावर पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलने सीबीआयला दिला. या अहवालावर प्रतिक्रिया देताना मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले की, "तपासादरम्यान मुंबई पोलिसांचं खच्चीकरण करण्यासाठी आणि दलाची बदनामी करण्यात आली. मात्र एम्सच्या अहवालाचं आश्चर्य वाटलं नाही. कारण आमच्या तपास योग्य दिशेने सुरु होतं. सत्य समोर येतंच."

मुंबई पोलीस आणि सरकारच्या बदनामीसाठी 80 हजार फेक अकाऊंट्स सुशांत सिंह आत्महत्येनंतर राज्य सरकार असो किंवा मुंबई पोलीस असो सोशल मीडियावर या दोघांविरोधात बराच मजकूर लिहिला गेला. मुंबई सायबर सेल अशा अनेक अकाऊंट्सची तपासणी करताना दिसू लागलं आहे. सायबर सेलने दिलेल्या अहवालानुसार, मुंबई पोलीस आणि राज्य सरकार यांची बदनामी करण्यासाठी तब्बल 80 हजार अकाऊंट्स नव्याने उघडली गेली आणि ती बनावट होती. एरव्ही मुंबई पोलिसांबद्दल कोणी काही बोलताना दिसत नाही. कारण मुंबई पोलिसांनी आपल्या कामगिरीने जगात लौकिक मिळवला आहे. पण सुशातच्या मृत्यूनंतर लगेचच 14 जूनपासून ही अकाऊंट्स उघडली गेली असं अहवाल सांगतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania on Beed | गरज नसलेले बंदुकीचे परवाने रद्द करा, पोलीस खात्याचा दुरूपयोग- दमानियाSatish Wagh Pune murder case | सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणाचा घटनाक्रम Abp MajhaUnique Farmer Id Maharashtra | राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार युनिट फार्मर आयडी Abp MajhaKalyan Crime Branch PC| कल्याण प्रकरणातील आरोपीला दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांच्या सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Gold Rate Today : सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? सराफा बाजारात वेगळं चित्र
सोने अन् चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडलं? 10 ग्रॅम सोनं किती रुपयांना?
Fact Check : हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
हार्दिक पांड्यानं WTC साठी रोहित शर्माला हटवण्याची मागणी केलीच नाही,फेक फोटो व्हायरल, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर 
Embed widget