एक्स्प्लोर

सत्य समोर येतंच, सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न : मुंबई पोलीस आयुक्त

आमचा तपास योग्य दिशेने सुरु होता. कुपर रुग्णालयाचा अहवालही योग्यच होता. सर्वोच्च न्यायालयानेही आमच्या तपासावर समाधान व्यक्त केलं होतं. एम्सच्या अहवालाबाबत आश्चर्य वाटलं नाही. सत्य कायमच समोर येतं, असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह म्हणाले.

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. "आमचा तपास योग्य दिशेने सुरु होता. कुपर रुग्णालयाचा अहवालही योग्यच होता. सर्वोच्च न्यायालयानेही आमच्या तपासावर समाधान व्यक्त केलं होतं," असं परमबीर सिंह म्हणाले. सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करुन मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आल्या, त्या अकाऊंटची चौकशी सुरु असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. तसंच काही माध्यम संस्थांनी केलेल्या बदनामीविरोधात निवृत्त आयपीएस कोर्टात गेल्याचं सिंह यांनी नमूद केलं.

सत्य कायमच समोर येतं: परमबीर सिंह "एम्समधील डॉक्टरांच्या पॅनलनेही सुशांत सिंह राजपूतची हत्या नसून आत्महत्या असल्याचा अहवाल सीबीआयला सोपवला. कुपर हॉस्पिटल, फॉरेन्सिक एक्स्पर्ट आणि आमच्या तपासात ही आत्महत्या असल्याचं म्हटलं होतं. आता एम्स डॉक्टरांच्या पॅनलनेही तसाच अहवाल दिल्याने आम्हाला आश्चर्य वाटत नाही. सत्य कायमच समोर येतं," असं परमबीर सिंह यांनी सांगितलं. "स्वार्थासाठी काहींनी आमचा तपास आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी नक्की मोहीम राबवल्या होत्या. आम्हाला आमच्या तपासावर विश्वास होता, सत्यावर विश्वास होता आणि सत्य समोर येतंच," असंही ते म्हणाले.

बदनामी करणाऱ्या फेक अकाऊंट्सचा तपास सुरु "सोशल मीडियावर अनेक बनावट अकाऊंट बनवण्यात आले होते, त्यातून फक्त शिवीगाळ केला जात होता, चुकीची माहिती पसरवली जात होती. सायबर एक्स्पर्ट याचा तपास करत असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल," अशी माहिती परमबीर सिंह यांनी दिली. "तसंच काही मीडिया हाऊसनेही मुंबई पोलिसांविरोधात मोहीम राबवून प्रतिमा मलिन केली होती. त्यांच्याविरोधात काही निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. त्यावर 8 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. आम्हाला विश्वास आहे की हायकोर्टही त्यावर योग्य निर्णय देईल," असं परमबीर सिंह पुढे म्हणाले.

कुटुंबीयांनीही आत्महत्या असल्याचंच म्हटलं होतं कुटुंबीयांनीही सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं, असं मुंबई पोलीस आयुक्त म्हणाले. "14 जून रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 16 जून रोजी त्याच्या कुटुंबीयांचे जबाब आम्ही नोंदवले होते. सुशांतचे वडील, त्याच्या तिन्ही बहिणी, मेहुण्याचा जबाब नोंदवला होता. त्या जबाबात त्यांनी सुशांतने आत्महत्या केली असून आमची याबाबत कोणतीही तक्रार नाही. त्यानंतरही अनेक वेळा आम्ही त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलावलं, परंतु कोणीही आलं नाही. यानंतर 40-45 दिवसांनी त्यांनी बिहारमध्ये एफआयआर दाखल केला. त्यातही त्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं म्हटलं होतं. तिथेही आरोप आत्महत्येचाच होता. कुटुंबातील कोणीही हत्येचा आरोप आमच्याकडे केला नव्हता. शिवाय हत्येचे पुरावेही नव्हते. तसंच कुपर हॉस्पिटल किंवा फॉरेन्सिक एक्स्पर्टनाही अशाप्रकारचं काही आढळलं नव्हतं. अशाच प्रकारचा अहवाल एम्सचाही असल्यामुळे आम्हाला आश्चर्य वाटलेलं नाही."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Police PC : सैफचा हल्लेखोर मोहम्मदकडून काय मिळालं? पोलीस उपायुक्तांची पत्रकार परिषदSaif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Raigad Guardian Minister : भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
भरत गोगावलेंना मंत्रिपदाचा कोट मिळाला पण पालकमंत्रीपदाचा मुकूट दूर राहिला; रायगडमध्ये अदिती तटकरेंसोबतचा वाद वाढणार?
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Embed widget