एक्स्प्लोर

मुंबईच्या विक्रोळीत 1800 किलो गांजा जप्त, नक्षलग्रस्त भागातून गांजाचा पुरवठा

मुंबईतील विक्रोळीत अठराशे किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे. महत्त्वाचं म्हणजे नक्षलग्रस्त परिसरातून गांजाचा पुरवठा करण्यात येत होता.

मुंबई : मुंबई पोलिसांनी अशा एका गँगचा पर्दाफाश केला आहे, जी दर महिन्याला मुंबईत चार टन गांजाचा पुरवठा करत होती. काही लोक गांजा मुंबईत पोहोचवत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी सेलच्या घाटकोपर पथकाला मिळाली होती. यानंतर घाटकोपर युनिटने विक्रोळीजवळ मुंबई-ठाणे हायवेवर सापळा रचून एका ट्रकला अडवला. त्यात नारळ भरले होते. तपासादरम्यान समोर आलं की, आरोपींनी नारळांच्या खाली ट्रकमध्ये एक कॅविटी बनवली जात, त्यात त्यांनी 1800 किलो गांजा लपवला होता. या जप्त केलेल्या गांजाची किंमत साडे तीन कोटी रुपये आहे. मुंबई क्राईम ब्रान्चच्या सहआयुक्त मिलन भारंबे यांनी ही माहिती दिली.

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आकाश यादव आणि दिनेश सरोज या दोघांना अटक केली आहे, जे ट्रकमध्ये गांजासोबत होते. आकाश यादवविरोधात वेगवेगळ्या पोलीस स्थानकांमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात पोलीस सध्या संदीप सातपुते आणि लक्ष्मी प्रधान यांचा शोध घेत आहेत. संदीप सातपुते हा भिवंडीतील एका गोदामाचा मालक असून तो ठाण्याच्या लुईस वाडी परिसरात राहतो. तो जवळपास पाच वर्षांपासून अशाचप्रकारे गांजाचा पुरवठा करत आहे. तर प्रधान आंध्र प्रदेशचा रहिवासी असून नक्षलग्रस्त भागात आपलं नेटवर्क वापरुन सातपुतेसारख्या मोठ्या प्रमाणात गांजा घेणाऱ्या आणि वितरण करणाऱ्यांना पुरवठा करण्याचं काम करतो.

भरांबे यांच्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, हे आरोपी दर महिन्याला महाराष्ट्रात सहा टन गांजाचा पुरवठ करायचे, त्यापैकी 4 टन गांजाची विक्री केवळ मुंबईत व्हायची.

गांजाचा पुरवठा कसा व्हायचा? संदीप सातपुते गांजाची खेप गोदामात लपवत असे आणि तिथून तो वितरित करायचा. सातपुते प्रत्येक असाईन्मेंटसाठी नवा ट्रक आणि चालकाची निवड करायचा. आंध्र प्रदेशातील नारळ आणायचे आहेत असं सांगून तो ट्रक भाड्याने घ्यायचा. यानंतर ट्रक आंध्र प्रदेशच्या सीमेपर्यंत जायचा. तिथे लक्ष्मी प्रधानचे लोक त्या ट्रकच्या चालक आणि सहाय्यकाला एखाद्या हॉटेलमध्ये थांबवून त्यांचा मोबाईल आपल्याकडे घ्यायचे. यानंतर तो ट्रक स्वत: चालवत अज्ञात स्थळी घेऊन जात त्या ट्रकच्या कॅविटीमध्ये गांजा लपवत असेल. मग गांजाच्या वर नारळ ठेवायचे जेणेकरुन गांजा दिसू नये.

प्राथमिक तपासात समोर आलं आहे की, गांजा ओदिशाहून यायचा. मग ट्रकवाले लोक तो हैदराबाद, पुणे आणि सोलापूर मार्गे मुंबईत आणायचे.

नक्षलवादी गांजाची शेती करतात? नक्षलवादी पैसे कमावण्यासाठी आणि आपली मोहीम सुरु ठेवण्यासाठी गांजाची शेती करतात. भरांबे यांनी सांगितलं की, हे लोक आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि ओदिशाच्या जंगलात गांजाची शेती करतात. सहजरित्या कोणी पोहोचू शकणार नाही, असं ठिकाण ते निवडतात. याशिवाय डोंगरावरही लपूनछपून गांजाची शेती करतात.

ओदिशा पोलिसांनीही अशीच कारवाई केली असून त्यांनी नक्षलवादी करत असलेली गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे.

लक्ष्मी प्रधान 1 किलो गांजासाठी जवळपास 8000 रुपये खर्च करत होत. तो सातपुते सारख्या सप्लायरला जवळपास 12 ते 15 हजार रुपयांत गांजा विकत होता. मग हे लोक ड्रग्ज बाजारात सुमारे 20 हजार रुपये प्रति किलोने गांजाची विक्री करत होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | माझ्या भावाचे मारेकऱ्यांना जेरबंद करा, संतोष देशमुखांच्या भावाची आर्त हाकAaditya Thackeray Meet Pravin Darekar : हसले, खिदळले, फोटो काढले; दरेकर आदित्य ठाकरेंना काय बोलले?Anna Bansode Pimpri-Chinchwad : मंत्रिपद मिळालं नाही, अण्णा बनसोडे नाराजRanajagjitsinha Patil Nagpur : तुळजापूर प्रकरणात नेमकं काय घडलं, राणा जगजीतसिंह पाटील म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
मोठी बातमी : संजय राऊतांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी, बाईकवर आले, हातात 10 मोबाईल अन्...; राजकीय वर्तुळात खळबळ
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
एकनाथ शिंदेंचा विश्वासू सहकारी हे पद मंत्रिपदापेक्षा मला जास्त जवळचे; नाराज विजय शिवतारेंचे सूर बदलले
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
भाजप आमदाराकडून मुंबईतील उर्दू शिक्षण केंद्र रद्द करण्याची मागणी; ठाकरे सरकारने केली होती सुरुवात
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
सोमनाथ सूर्यवंशीला श्वासोच्छवासाचा त्रास होता, हा जावईशोध कुठून लागला? जितेंद्र आव्हाडांचा थेट सवाल
Ravichandran Ashwin: तर मला हार्ट अटॅक आला असता...आर. अश्विन कॉल हिस्ट्री शेअर करत हे काय बोलून गेला? 
सचिन अन् कपिल देवचं नाव घेतलं, स्क्रीन शॉट शेअर केला, अश्विन म्हणाला तेव्हा मला हार्ट अटॅक आला असता....
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
संतोष देशमुखसारखं काही...; घर अन् सामना कार्यालयाची रेकी, संजय राऊत संतापले, म्हणाले सुरक्षाही काढली
Gold Rate Update : सोने दरात MCX वर तेजी पण सराफा बाजारात घसरण, 300 पासून 650 रुपयांपर्यंत दर घसरले
सोने दरात मोठी घसरण, चांदीचे दरही घसरले, MCX अन् सराफा बाजारात वेगळं चित्र
मनसेनं थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
मनसेनं थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका; मराठी माणसाला मारहाण, राज ठाकरे संतापले, थेट इशारा
Embed widget