18 वर्षांपूर्वी सीएसएमटीला युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा, जाणून घ्या गौरवशाली इतिहास
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus: देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आजच्याच दिवशी युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता.
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus: देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आजच्याच दिवशी युनेस्कोकडून जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. याला आता 18 वर्ष पूर्ण झाली आहे. याशीच संबंधित एक ट्वीट मध्य रेल्वेने केले आहे. युनेस्कोने 7 जुलै 2004 साली या रेल्वे स्टेशनला आपल्या जागतिक वारसा यादीत समावेश केला होता. या रेल्वे स्टेशनच्या रचनेवर व्हिक्टोरियन आणि मुघल वास्तुकलेचा प्रभाव आहे. सीएसटीची रचना ब्रिटनमधील अनेक रेल्वे स्थानिकांशी मिळतीजुळती आहे.
#TodayInHistory
— Central Railway (@Central_Railway) July 7, 2022
Chhatrapati Shivaji Maharaj Terminus building was inscribed on UNESCO world heritage list on this day (7.7.2004) pic.twitter.com/R0AvX16qQM
ब्रिटिशांच्या काळात म्हणजेच 1887 मधील व्हिक्टोरिया टर्मिनस (आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) नावाच्या या स्टेशन इमारतीच्या बांधकामासाठी त्यावेळी 16.13 लाख रुपये खर्च आला होता. भारतीय वास्तुकला लक्षात घेऊन गॉथिक शैलीत ही इमारत बांधण्यात आली आहे. या वास्तूचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याचा मध्यवर्ती घुमट, ज्याच्या वर 16 फूट 6 इंच मोठी मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारतीय रेल्वेचे सर्वात भव्य इमारत असलेले रेल्वे स्टेशन आहे.
चार वेळा बदलण्यात आले नाव
ब्रिटीशांनी जेव्हा भारतात रेल्वे सेवा सुरू केली, त्यावेळी त्यांनी मुंबईच्या बोरीबंदर परिसरात हे रेल्वे स्टेशन बांधले. यावरूनच याला बोरीबंदर स्टेशन असे नाव देण्यात आले. हे स्टेशन ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेजवळ होते. 1878 मध्ये हे स्टेशन नव्याने बांधण्याचे काम सुरू झाले आणि ते 1888 मध्ये पूर्ण झाले. याआधी 1887 मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त या इमारतीला 'व्हिक्टोरिया टर्मिनस' असे नाव देण्यात आले. पुढे 1996 मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस हे नाव बदलून याचे छत्रपती शिवाजी टर्मिनस असे नामकरण करण्यात आले. नंतर याचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.
दरम्यान, युनेस्कोच्या यादीत भारतातील 40 स्थाने समाविष्ट आहे. ज्यात 32 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्रित निकष स्थान आहेत. युनेस्कोच्या यादीत सर्वाधिक स्थानकांची नोंद झालेल्या देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक आहे. या यादीत चीन आणि इटली या दोन्ही देशांच्या सर्वाधीक 55 स्थाने समाविष्ट आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
World Heritage Day : ...म्हणून साजरा केला जातो जागतिक वारसा दिन, जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व