एक्स्प्लोर
मुंबईतील 16 वर्षीय तरुण लेप्टोचा सातवा बळी
मुंबईत आतापर्यंत सात जणांना लेप्टोच्या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
मुंबई : मुंबईत लेप्टोने दगावल्याचा आकडा आता सातवर पोहोचला आहे. कांदिवलीत राहणाऱ्या तन्मय कमलेश प्राज्ञे या 16 वर्षीय मुलाचा लेप्टोस्पायरोसिस या आजारामुळे शनिवारी दुर्दैवी अंत झाला. लेप्टोच्या आजारामुळे याआधी सहा जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
तन्मय कमलेश प्राज्ञे हा मूळचा दापोलीचा होता. वडील हिऱ्याच्या कंपनीत हिरे पॉलिश करायचं काम करतात. तन्मयला दहावीत 70 % गुण होते.
नुकतेच त्याने गोरेगावमधील पाटकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला होता. महाविद्यालयात प्रवेश घेऊन आल्याच्या आनंदातच तन्मय आपल्या मित्रांसोबत कांदिवलीतील शिवमंदिराजवळ असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला. पण त्या तलावाच्या पाण्यात नजीकच्या नाल्याचे पाणीदेखील मिसळत होते. हे तन्मय आणि त्याच्या मित्रांच्या लक्षत आले नाही.
पोहून घरी आल्यानंतर तन्मयला संध्याकाळी त्याला ताप, उलटी आणि चक्करचा त्रास होऊ लागला. त्रास होत असल्यामुळे तन्मयच्या आई-वडिलांनी त्याला स्थानिक डॉक्टरांना दाखवले. पण त्याने काही फरक पडला नाही. काही दिवसांनी त्याला जास्तच त्रास होऊ लागला.
24 जुलैला तन्मयला पुन्हा कांदिवलीतील अमर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या टेस्ट करण्यात आल्या. तेव्हा समजले की तन्मयला लेप्टोची लागण झाली आहे. परंतु, त्या रुग्णालयात लेप्टोच्या उपचारासाठी लागणारे उपकरणे नसल्या कारणाने 25 जुलैला तन्मयला मालाड येथील सिद्धीविनायक मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान तन्मय कोमामध्ये गेला. हळूहळू त्याचा मेंदू आणि लिव्हर निकामी झाले. अखेर शनिवारी पहाटे चार वाजता तन्मयने सर्व उपचारांना प्रतिसाद देणे बंद केले आणि त्याने अखेरचा श्वास घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement